Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला; पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. यामध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी करून भल्या भल्या गुंडांना गजाआड करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. यामध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी करून भल्या भल्या गुंडांना गजाआड करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यापाठोपाठ ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनाही मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले.Nashik district, a bastion of law; Police Commissioner Sandeep Karnika honored by the Chief Minister!!



सर्वोत्तम पोलीस आयुक्त :

– संदीप कर्णिक – नाशिक

– आशुतोष डुंबरे – ठाणे

– रविंद्र कुमार सिंगल – नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.

सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या :

– महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) – प्रदीप पी.

– झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (SRA) – महेंद्र कल्याणकर

– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – योगेश म्हसे

– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) – संजय मुखर्जी

– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) – एम. देवेंदर सिंह

– महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) – संजीव जयस्वाल

– महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) – डॉ. प्रमोद नाईक

– महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) – पी. वेलरासु

– महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) – लोकेश चंद्र

– महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) – ओम प्रकाश बकोरिया

Nashik district, a bastion of law; Police Commissioner Sandeep Karnika honored by the Chief Minister!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment