Trending News

No trending news found.

Sunday, 19 April
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!

नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.

नाशिक : नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.

नाशिक मधल्या टाटा कन्सल्टींग सर्विसेस म्हणजेच TCS मधल्या कॉर्पोरेट जिहादची सुरुवात महिलांचा लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव हे प्रकरण 2023 पासून सुरू होते त्यावेळी आरोपींच्या कुटुंबीयांनी कधीच कुठली तक्रार केली नव्हती. मराठी माध्यमांमध्ये सुद्धा त्या संदर्भातल्या बातम्या कधी आल्या नाहीत किंवा मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा कुठली शोध पत्रकारिता करून नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहाद शोधून काढला नाही.

पोलिसांनीच लावले प्रकरण धसाला

एका पीडितेच्या कुटुंबीयांच्या जागरूकतेमुळे कॉर्पोरेट जिहादच्या विषयाला तोंड फुटले. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे तपास यंत्रणा राबवून आणि त्यातही धाडसी महिला पोलिसांना त्यामध्ये तपास करायला लावून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. या घडामोडी घडत असताना आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू असताना कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने तोंड उघडले नव्हते मराठी माध्यमांनी सुद्धा त्याच्या बातम्या दिल्या नव्हत्या आणि आरोपींच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन बोलण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवला नव्हता.



कॉर्पोरेट जिहादचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

पण पोलिसांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण धसाला लावले. मुख्य संशयित आरोपी दानिश शेख आसिफ अन्सारी तौसीफ आतार आणि शाहरुख कुरेशी यांच्या मुसक्या आवळल्या. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचविले. नाशिक कॉर्पोरेट जिहाद मधली मास्टर माईंड निदा खान हिचे दहशतवादी डॉ. शाहीन हिच्याशी कनेक्शन असल्याचे उघडकीस आणले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे मायनेच बदलले. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचले.

 मराठी माध्यमांनी बदलला रिपोर्टिंगचा पॅटर्न

त्यानंतर मराठी माध्यमांनी या संपूर्ण प्रकरणाचे रिपोर्टिंग करायचा पॅटर्नच बदलून टाकला. मराठी माध्यमांनी आरोपींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात केली. आरोपींच्या कुटुंबीयांनी ताबडतोब माध्यमांचा आधार घेऊन victim card कार्ड खेळायला सुरुवात केली. आरोपी दोषी असतील तर त्यांना शिक्षा करा, पण संपूर्ण मुस्लिम समाजाला वेठीस धरू नका, असे आरोपींचे कुटुंबीय बोलायला लागले. समाजातले लिबरल युट्युबर्स लगेच नाशिक कॉर्पोरेट जिहादचे वास्तव तथाकथित धर्मनिरपेक्ष बुद्धीने सांगायला लागले. दानिश, तौसीफ, शाहरुख हे कसे सज्जन युवक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कुठली चांगली कामे केलीत, याविषयीचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी चालू केले. वर उल्लेख केलेले सगळे आरोपी असा कुठला गुन्हा करतील, असे आम्हाला वाटलेच नव्हते, या शब्दांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबीयांनी कानावर हात ठेवले. पण त्यापलीकडे जाऊन आरोपींच्या कुटुंबीयांनी हिंदुत्ववादी संघटनांवर ठपका ठेवला. मराठी माध्यमांनी हिंदुत्ववादी संघटनांवर ठपका ठेवणाऱ्या बातम्यांचे मोठ्या प्रमाणावर रिपोर्टिंग केले.

हा सगळा प्रकार म्हणजे मराठी माध्यमांच्या शोध पत्रकारितेचे अपयश आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष कॉर्पोरेट जगताचा पर्दाफाश होता, पण तोच पचला नसल्यामुळे मराठी माध्यमांनी आणि आरोपींच्या कुटुंबीयांनी victim card खेळून जिहादी प्रवृत्तींचा नीच खेळ divert करायचाच “डाव” खेळला, पण म्हणून तो हिणकस डाव उघड्यावर आल्याशिवाय राहिला नाही.

Nashik corporate Jihad; accused muslim families plays victim card

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment