Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Mundra port : गुजरातच्या मुंद्रा किनाऱ्यावर 118 किलो कोकेन जप्त; ₹1000 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

: गुजरातमधील मुंद्रा किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात ATSने संयुक्त कारवाई करत तब्बल 118 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे ₹1000 ते ₹1150 कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, ही अलीकडच्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या सागरी ड्रग्ज कारवायांपैकी एक मानली जात आहे.

वृत्तसंस्था

अहमदाबाद : Mundra port गुजरातमधील मुंद्रा किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात ATSने संयुक्त कारवाई करत तब्बल 118 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे ₹1000 ते ₹1150 कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, ही अलीकडच्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या सागरी ड्रग्ज कारवायांपैकी एक मानली जात आहे.Mundra port

ही कारवाई 25 आणि 26 मेच्या मध्यरात्री करण्यात आली. गुजरात ATSला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ब्राझीलमधून आलेली कोकेनची मोठी खेप समुद्रमार्गे मुंद्रा किनाऱ्याजवळ उतरवली जाणार होती. त्यानंतर ती छोट्या बोटीमार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा कट होता. याच माहितीच्या आधारे ATS आणि भारतीय तटरक्षक दलाने ‘MV Europe’ या जहाजाला रोखून तपासणी केली.Mundra port



कारवाईदरम्यान संशयितांनी काही पिशव्या समुद्रात फेकल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर समुद्रातून पाच पिशव्या बाहेर काढण्यात आल्या. या पिशव्यांमध्ये 115 हून अधिक पॅकेट्समध्ये भरलेले सुमारे 118 किलो कोकेन सापडले. तपासात ड्रग्जसोबत Apple AirTags आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन डिव्हाइसही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे हे संपूर्ण रॅकेट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चालवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात तीन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जुमा नासिर ओमर नावाच्या संशयिताला जहाजावरून पकडण्यात आले, तर आणखी दोन विदेशी नागरिकांना दिल्लीतील द्वारका भागातून ताब्यात घेण्यात आले. एका आरोपीने कारवाईदरम्यान समुद्रात उडी मारून पळ काढल्याचेही समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे.

तपास यंत्रणांच्या मते, ही ड्रग्ज खेप ब्राझीलमधून निघून लॅटिन अमेरिका, मेक्सिको, अमेरिका आणि कराचीमार्गे भारतात पोहोचली होती. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय असल्याचा संशय अधिक बळावला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा वापर आंतरराष्ट्रीय तस्करांकडून वाढत्या प्रमाणात केला जात असल्याची चिंताही यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे.

गुजरात सरकारने या कारवाईला “ड्रग्ज माफियांवर मोठा प्रहार” असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी “गुजरातला ड्रग्जचे गेटवे बनू देणार नाही,” असा इशारा दिला. दरम्यान, ATS, तटरक्षक दल आणि केंद्रीय यंत्रणा आता या नेटवर्कचे भारतातील आणि परदेशातील इतर दुवे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

1000 Crore Cocaine Seized at Mundra Coast: Gujarat ATS and Coast Guard Bust Mega Drugs Racket

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment