Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

ममता बॅनर्जींचे तृणमूळ काँग्रेसकडून एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर; पण स्वतः मात्र नंदीग्राम मधून लढायला घाबरल्या!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख काँग्रेसचे सगळेच्या सगळे उमेदवार एका झटक्यात जाहीर करून टाकले, पण स्वतः मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला त्या घाबरल्या.

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख काँग्रेसचे सगळेच्या सगळे उमेदवार एका झटक्यात जाहीर करून टाकले, पण स्वतः मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला त्या घाबरल्या.Mamatha Banerjee frightened in contesting nandigram constituency

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध रान उठाविले होते. पण ममतांच्या त्या पवित्र्याचा फारसा उपयोग झाला नाही. निवडणूक आयोगाने नियोजित वेळेनुसारच विधानसभा निवडणुका जाहीर केल्या त्याचबरोबर मतदार याद्यांच्या परीक्षणानंतर तब्बल 94 लाख मतदारांची गच्छंती केली. त्यानंतरच निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या.



– तृणमूळ काँग्रेसचे सगळे उमेदवार जाहीर

निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने सुरुवातीला मोठी आघाडी घेऊन 145 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने बडे बडे दिग्गज विधानसभेच्या मैदानात उतरविले. भाजपा पाठोपाठ आज ममता बॅनर्जी यांनी एकाच झटक्यात तृणमूळ काँग्रेसचे 294 उमेदवार जाहीर करून भाजपला धक्का दिला. पण हा धक्का देताना त्या स्वतः मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरल्या. त्यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातूनच आपली उमेदवारी जाहीर करणे पसंत गेले.

– धाडस आले होते अंगाशी

2021 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी धाडस करून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदिग्राम मधून निवडणूक लढवायचा डाव खेळला होता, पण तो त्यांच्यावरच उलटला. तृणमूळ काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम मध्ये भारी पडले होते. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचेच विश्वासू असलेले सुवेंदू अधिकारी त्यांच्याशी गंभीर मतभेद झाल्यानंतर भाजपमध्ये दाखल झाले म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी 2021 मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचा धाडसी निर्णय घेतला होता. नंदीग्राम मध्ये सुवेंदू अधिकारी यांना हरविले की आपल्या मार्गातला भाजपचा सगळ्यात मोठा काटा दूर होईल, असा त्यावेळी त्यांचा होरा होता, पण ममता बॅनर्जी यांचा तो होरा त्यावेळी चुकला. सुवेंदू अधिकारी यांनी आपला बालेकिल्ला टिकवून नंदीग्राम मधून ममता बॅनर्जींना हरविले होते. शेवटी भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना विधानसभेत पोहोचावे लागले होते.

– नंदीग्राम मधून कापली कन्नी

पण 2026 च्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींनी नंदीग्राम मधून लढायचे धाडसच दाखविले नाही. तिथे सुवेंदू अधिकारी उभे आहेत हे लक्षात घेऊन ममतांनी नंदिग्राम मधून कन्नी कापली आणि त्या स्वतःच्याच भवानीपूर मतदारसंघातून लढायला तिकडे गेल्या. बाकी भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत 20 आमदार निवडून आणता आले तरी खूप आहेत, अशा गमजा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मारल्या, पण प्रत्यक्षात सुवेंदू अधिकारी यांच्यासारख्या एकेकाळच्या आपल्याच समर्थकाविरुद्ध दुसऱ्यांदा निवडणूक लढवायला मात्र ममता बॅनर्जी घाबरल्या. तृणमूळ काँग्रेसच्या उमेदवारी यादीतून हेच “राजकीय सत्य” बाहेर आले.

Mamatha Banerjee frightened in contesting nandigram constituency

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment