Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!!

महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे "वजीर" बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी "प्यादी"!! हीच महाविकास आघाडीतल्या दोन वजीरांची अवस्था झाली आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेत खासदार होणार का?? आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा आमदार होणार का??

नाशिक : महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!! हीच महाविकास आघाडीतल्या दोन वजीरांची अवस्था झाली आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेत खासदार होणार का?? आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा आमदार होणार का?? अशी चर्चा महाविकास आघाडीबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे नावाच्या दोन “वजीरांना” आता स्वबळावर किंवा एकमेकांच्या बळावर सुद्धा राज्यसभा आणि विधान परिषद दिसणार नाही, असे आकडेवारीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या दोन “वजीरांना” भाजप किंवा काँग्रेस “प्यादी” बनवूनच राज्यसभा आणि विधान परिषदेत पाठवू शकेल, अन्यथा त्या दोघांनाही या दोन्ही सभागृहांची तोंडे दिसणे कठीण होईल.Mahavikas Aghadi has had enough of Gochi; Two big “ministers” have become “pawns” for MP and MLA seats!!

राज्यसभेसाठी मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. त्यावेळी शरद पवार, रजनी पाटील आणि प्रियांका चतुर्वेदी असे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य रिटायर होत आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांचे संख्याबळ एवढे कमी आहे, की यांच्यापैकी एकालाच आमदारांच्या संख्याबळावर राज्यसभेवर निवडून जाता येईल, म्हणून तर शरद पवारांनी संजय राऊत यांच्या तोंडून आपल्या उमेदवारीची रिंग इतरांच्या पेक्षा अधिक रिंगणात टाकून ठेवली आहे.



– सुनेच्या पक्षाकडे धाव घेण्याची पवारांवर वेळ

एरवी शरद पवारांचे वय आणि ज्येष्ठता एवढी मोठी की त्यांना आमदारांच्या संख्याबळापेक्षा स्वतःच्या प्रतिष्ठेवरच राज्यसभेवर केव्हाही निवडून जाता आले असते पण पवारांनी “डबल” आणि “ट्रिपल” अशा काही गेमाच करून ठेवल्यात, की त्यांना राज्यसभेवर पाठवायचे असेल, तर शिवसेना आणि काँग्रेस यांना राजकीय कुर्बानी द्यावी लागेल आणि त्याला सध्या काँग्रेस तरी तयार दिसत नाही. त्यामुळे शरद पवारांना महाविकास आघाडीतून राज्यसभेचे तोंड दिसणार नसेल, तर त्यांना त्यांच्या सुनेच्या पक्षाचा म्हणजेच घड्याळाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी त्यांना भाजपची परवानगी लागेल. म्हणजेच शरद पवार नावाचे महाविकास आघाडीतले “वजीर” भाजपच्या सत्तेचे “प्यादे” म्हणूनच राज्यसभेत प्रवेश करतील किंबहुना त्यांना तसा तो करावा लागेल.

– उद्धव ठाकरेंना बनावे लागेल “प्यादे”

विधान परिषदेसाठी मे महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आदी सदस्य निवृत्त होणार आहेत. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी किमान 27 मतांची गरज आहे. तेवढी मते शिवसेनेकडे उपलब्ध नाहीत. शिवसेनेकडे फक्त 20 आमदार उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सुद्धा महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज लागेल, पण या दोन्ही पक्षांनी राजकीय कुर्बानी द्यायची नाही असे ठरविले, तर उद्धव ठाकरेंना सुद्धा विधान परिषदेचे तोंड दिसणे कठीण आहे अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचेच असेल तर भाजपच्या दिशेने तोंड करावे लागेल. भाजप आपल्या मतांमधला विशिष्ट कोटा उद्धव ठाकरेंना देऊन विधान परिषदेवर पाठवू शकेल, पण त्यासाठी शिवसेनेच्या “वजीराचा” भाजपचे नेते “प्यादे” करून सोडतील आणि मगच उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे तोंड दाखवतील.

– ठाकरे पवार “प्यादी” बनतील की स्वाभिमान दाखवतील??

काहीच वर्षांपूर्वी भाजपला जमालगोटा देण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे नावाचे दोन “वजीर” एकत्र आले होते. त्यांनी त्यावेळी भाजपला जमालगोटा दिला सुद्धा होता, पण भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो जमालगोटा असा काही परतवून लावला की शेवटी शरद पवार आणि उद्धव ठाकरे नावाच्या दोन “वजीरांना” राज्यसभा आणि विधान परिषदेचे तोंड पाहण्यासाठी “प्यादी” बनायची वेळ आली. आता हे दोन “वजीर” खरंच “प्यादी” बनतात, की स्वाभिमानाने राज्यसभा आणि विधान परिषदेच्या बाहेरच राहणे पसंत करतात??, हे आगामी काळात कळून येईल.

Mahavikas Aghadi has had enough of Gochi; Two big “ministers” have become “pawns” for MP and MLA seats!!

महत्वाच्या बातम्या

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment