Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Maharashtra Budget : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Budget राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.Maharashtra Budget

विधानभवन येथे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.Maharashtra Budget



राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे.सोमवार दि. 2 मार्च 2026 रोजी होळी आणि 3 मार्च 2026 रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. दिनांक 1,7,8,14,15,21,22 मार्च रोजी शासकीय सुट्टी आणि दिनांक 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तर दि.20 मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

या अधिवेशनात यावर होणार चर्चा

– संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.या अधिवेशनात यावर चर्चा करण्यात येणार आहे.
– जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.
– मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होईल.
– निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होईल.

Maharashtra Budget Session 2026: Feb 23 to March 25; Budget on March 6

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment