Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!

जणू पवार एकटेच टाकतात "डाव" आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!, असे म्हणायची वेळ काही youtubers आणि "पवार बुद्धीच्या" पत्रकारांनी चालविलेल्या "youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा" या सिनेमामुळे आली.

नाशिक : जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!, असे म्हणायची वेळ काही youtubers आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी चालविलेल्या “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” या सिनेमामुळे आली.Kaluram chaudhary exposed Sharad Pawar’s plan against sunetra Pawar

अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर झालेल्या सगळ्या राजकारणाचा नूर बघून तीनच दिवसांनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप सुद्धा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आणि नरेश अरोरा यांनी political catalyst ची भूमिका बजावली. यावेळी घडलेल्या सगळ्या राजकारणातून या तिघांनी पवारांच्या गोटातल्या नेत्यांकडून आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांकडून शिव्या सुद्धा खाल्ल्या. सुनेत्रा पवार यांच्या अडून या तिघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कब्जा करायचा आहे त्या पक्षाला भाजपच्या दावणीला बांधायचे आहे, असा आरोप देखील सहन केला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काल त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तरे दिली. राष्ट्रवादीचे विलीनीकरण म्हणजे कोणत्या पक्षात कुठल्या पक्षाचे विलीनीकरण असा सटीक सवाल सुनील तटकरे यांनी विचारून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बॅकफूटवर ढकलले.



– youtube वर गोंधळ, बारामतीत मुजरा

तरी देखील “पवार बुद्धीच्या” काही youtubers आणि पत्रकारांनी हा पवारांचा “डाव” आहे. पवारांनीच “डाव” टाकून सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. सगळी पदे पवारांच्या घरातच आणून ठेवली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना काही मिळू दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांना “गेम” मधून बाजूला केले, असा दावा केला. पण प्रत्यक्षात “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” असलाच हा प्रकार होता.

– काळूराम चौधरी काय म्हणाले??

या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे बारामतीतले कट्टर विरोधक आणि बहुजन समाज पक्षाचे नेते काळूराम चौधरी यांनी बारामतीतल्या पवार कुटुंबाचे वेगवेगळेच “राजकीय रहस्य” खोलले. हे तेच काळूराम चौधरी आहेत, ज्यांच्या मुलीने बहुजन समाज पक्षाच्या हत्ती तिकिटावर अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून बारामती नगर परिषदेत दिमाखात प्रवेश केला. या काळूराम चौधरी यांनी अजित पवारांना कायम प्रखर राजकीय विरोध केला. त्यांनी कधीच बहुजन समाज पक्ष सोडला नाही, की अजितदादांना राजकीय विरोध करणे सोडले नाही म्हणून त्यांनी व्यक्त केलेल्या मताला विशेष महत्त्व आहे.

– सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांना वाळीतच टाकले असते

काळूराम चौधरी यांनी सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेचे पूर्ण समर्थन केले आणि ते समर्थन करताना त्यांनी जे उद्गार काढले, ते फार महत्त्वाचे ठरले. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, हे फार बरे झाले. कारण पवारांनी आणि त्यांच्या बाकीच्या कुटुंबीयांनी सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना वाळीत टाकले असते. त्या तिघांचे राजकीय भवितव्य उद्ध्वस्त केले असते. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान राखला. ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला, त्या हिंदू कोड बिलाने महिलांना समान अधिकार दिले. त्याचा सन्मान सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन केला, हे बरे झाले. नाही तर पवार कुटुंबाने त्यांना वाळीतच टाकले असते, असे काळूराम चौधरी म्हणाले. काळूराम चौधरी यांनी या वक्तव्यातून पवार कुटुंबीयांच्या तथाकथित पुरोगामीत्वाचा बुरखा फाडला.

– पवारांचा “डाव” काय होता??

वास्तविक अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे पिल्लू सोडून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुनेत्रा पवारांचा शपथविधी रोखायचा होता. इतकेच नाही, तर अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा करायचा होता. पण सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेमुळे शरद पवारांचा “डाव” उधळला गेला. हेच राजकीय वास्तव काळूराम चौधरी यांनी अत्यंत प्रखर आणि तिखट शब्दांमध्ये मांडले. ते अजित पवारांचे कट्टर विरोधात असल्याने त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारण त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पवारांच्या राजकारणाचे विच्छेदन केले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे सगळे कुटुंब शोकात असताना सुनेत्रा पवार यांनी शपथ घ्यायची नाही, पण पवारांनी मात्र नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करायची. जणू काही पवारांना माहितीच नव्हते, की नीरा नदीत प्रदूषण होते. त्यांना काय नीरा नदीतले प्रदूषण आज कळले??, पण पवारांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली आणि सुनेत्रा पवारांना शरद पवारांचा “डाव” लगेच कळला. त्यांनी तो “डाव” ओळखून अत्यंत वेगाने हालचाली करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, हे राजकीय वास्तव काळूराम चौधरी यांनी समोर आणले. फक्त “पवार बुद्धीच्या” “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” करणाऱ्या पत्रकारांना हे वास्तव समजले नाही.

Kaluram chaudhary exposed Sharad Pawar’s plan against sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment