विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन संपन्न झाले. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त उभारलेली ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत सामाजिक समता आणि सक्षमीकरणाला चालना देणार आहे.Jyoti Savitri Zilla Parishad School; A new beacon of education!!
– शाळेची ठळक वैशिष्ट्ये :
– क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित आणि शिक्षणप्रधान विचारांना साकार करणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री छगन… pic.twitter.com/xHDoYgFSzw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2026
– बालवाडी ते इयत्ता 12 वीपर्यंत CBSE अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा उपलब्ध
– सुमारे 12 एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पासाठी 2022 मध्ये शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेला आवश्यक शासकीय मान्यताही देण्यात आली आहे
– 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी ते इयत्ता 2 रीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून सध्या सुमारे 260 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे
– पुढील वर्षापासून इयत्ता 6 वीपासून निवासी शाळा आणि प्रारंभी 40 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा
– या प्रकल्पासाठी CSR अंतर्गत ₹21 कोटी, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद निधीतून ₹15 कोटी असा एकूण मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत
Jyoti Savitri Zilla Parishad School; A new beacon of education!!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!
- US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात
- Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था
- पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!



Post Your Comment