Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Jayant Patil : सुनेत्रा पवारांच्या मदतीला कधीही जाऊ, जयंत पाटील यांचे मोठे विधान; शरद पवार गटाच्या स्वतंत्र वाटचालीचे दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला कोणत्याही वेळी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. आमच्या पक्षाकडे शरद पवारांचे नेतृत्व आहे. आचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण वेळ पडल्यास आम्ही केव्हाही सुनेत्रा पवारांच्या मदतीला धावून जाऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार गटाने विलीनीकरणाच्या चर्चेचा मुद्दा आता मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Jayant Patil  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला कोणत्याही वेळी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. आमच्या पक्षाकडे शरद पवारांचे नेतृत्व आहे. आचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण वेळ पडल्यास आम्ही केव्हाही सुनेत्रा पवारांच्या मदतीला धावून जाऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार गटाने विलीनीकरणाच्या चर्चेचा मुद्दा आता मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.Jayant Patil

अजित पवारांचे गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पण आता जयंत पाटील यांनी ही चर्चा मागे पडल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. ते यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, माझी विलीनीकरणाच्या मुद्यावर भाष्य करण्याची इच्छा नाही. शरद पवार आमच्या पक्षाचे नेतृत्व करतात. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल. आमची सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या समोर अडथळे किंवा प्रश्न उभे करण्याची इच्छा नाही.Jayant Patil



राजकारणात उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर हे स्पष्ट झाले. आजचा दिवस उद्या आहे का हे नियतीला मान्य आहे का? असे अनेक प्रश्न आहेत.

विलीनीकरणावर भाष्य करू नाटत नाही

जयंत पाटील यांनी यावेळी विलीनीकरणाच्या मुद्यावर भाष्य करण्यास ठाम नकार दिला. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. भारत-अमेरिका करारामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक नवी आव्हाने निर्माण होणार आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विषय आहेत. इतरही बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे आमचा प्रश्न त्या दृष्टिकोनातून विचार करेल. राहिला प्रश्न विलीनीकरणाचा, तर त्यावर मला आज भाष्य करण्याचा अधिकार नाही आणि भाष्य करावे असे वाटतही नाही. आमची ज्या माणसाशी, नेत्याशी चर्चा झाली, तेच नसल्यामुळे अशा प्रश्नाला उत्तर देण्याची मला आवश्यकताही वाटत नाही.

सुनेत्रा पवार बारामतीत असताना आम्ही 4-5 जणांनी त्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आम्ही त्यांना सांगितले की, काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, तर आम्हाला सांगा. आम्ही कधीही तुमच्या मदतीला धाऊन येऊ. मनात काहीही किंतू बाळगू नका. विलीनीकरणाच्या चर्चेच्या अगोदरही एक-दोनदा माझ्या व त्यांच्या भेटी झाल्या होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा किंवा पार्थ पवारांचा मुद्दा असेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यांच्यापुढे कोणतेही अडथळे किंवा प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही, असेही जयंत पाटील यांनी यावेळी जोर देऊन सांगितले.

‘Will Help Sunetra Pawar Anytime’: Jayant Patil Signals Independent Path for NCP (SP)

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment