Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Kondhwa : कोंढव्यात हिंदूंना शोधण्यासाठी आता दुर्बिण लावावी लागेल; 2047 पर्यंत देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र, नीतेश राणे आक्रमक

पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत 'इस्लाम राष्ट्र' बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Kondhwa पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.Kondhwa

कोंढवा परिसरात सुरू असलेल्या घडामोडींवर टीका करताना राणे म्हणाले की, तिथे सर्व काही ‘हिरवे’ करण्याचा प्रयत्न काही ‘हिरव्या सापांच्या’ माध्यमातून होत आहे. माझ्या सहकाऱ्याने हीच वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली असून, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते सत्य सांगण्याचा प्रयत्न माझ्या भाजप सहकाऱ्याने केले आहे, माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे.Kondhwa



राऊतांना उद्धव ठाकरेंचा इतिहास माहिती नाही

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना पुढे घेऊन जावी लागली ते पण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठीच, असा टोला राणेंनी लगावला आहे.

मेहेंदळेवर गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना ‘पाकिस्तान’ आणि ‘कराची’शी करणं भाजप पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे यांना चांगलंच महागात पडलं आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडवल्याचा ठपका ठेवत कोंढवा पोलिसांनी मेहेंदळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सर्वेश मेहेंदळे यांनी कोंढव्यातील मुख्य रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या इमारतीतून एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये ते हॉस्पिटलच्या बाहेरील कथित अतिक्रमणांबाबत माहिती देत होते. मात्र, ही माहिती देताना त्यांनी या परिसराचा उल्लेख ‘कराची’ असा केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याला “वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान” असे प्रक्षोभक कॅप्शन दिले होते.

Hindus in Kondhwa; Conspiracy to make the country an Islamic nation by 2047, Nitesh Rane aggressive

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment