Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Girish Mahajan : आपले आमदार-खासदार कसे टिकून राहतील याकडे लक्ष द्या; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Girish Mahajan शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.Girish Mahajan

गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय कसा होईल? यश कसे मिळेल? याकडे बघावे असे महाजन म्हणाले. आम्ही तर आमचे लोक परत घेणार नाही, पण तुम्ही तुमची मूठभर जे लोक आहेत ते सांभाळून ठेवा, असा टोला महाजन यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार गटाकडून, शिंदे गटाकडून आमच्याकडे कोण येत आहेत, या राऊत यांच्या गोष्टींना लोक कंटाळले आहेत, असेही महाजन म्हणाले.Girish Mahajan



एकनाथ खडसे 7-8 गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत

पुढे एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी तक्रार करावी, कुठे डायरेक्टर आहे, कुठे मी पैसे लपवले आहेत, त्यांनी माझी तक्रार करावी. तुमची प्रत्येक आठवड्याला एसआरडी चौकशी होते, गुन्हे दाखल होत आहेत, ते तुम्ही बघा. लोकांच्या जमिनी खाऊन चालले महार वतानाच्या जमिनी खाऊन चालले, हायवेमध्ये जमिनी घेतात, त्यांचे कार्यकर्ते लगेच झाडे लावतात. तसेच 7-8 गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. 136 कोटी रुपयांचा रॉयल्टीमध्ये तुम्हाला दंड झालेला आहे. आपण आपले बघा, माझ्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा, असे महाजन यांनी म्हटले.

मुलीच्या नावावर घेतली ती का तुम्ही परत करत नाही?

पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मला जसे कळाले की ती जमीन महार वतनाची आहे, ती जमीन लगेच परत केली. खरेदीचे देखील पैसे घेतले नाहीत, जे घेतले होते ते सुद्धा पैसे त्यांना परत दिले. तुम्ही जी जमीन मुलीच्या नावावर घेतली ती का तुम्ही परत करत नाही? असा सवालही महाजन यांनी खडसे यांना विचारला आहे. तसेच आपल्या एवढ्या बातम्या येत आहेत ती म्हातारी जमिनीसाठी चकरा मारत आहे. मात्र, तुम्हाला काही वाटते आहे का? असा सवालही महाजन यांनी केला.

फोनवर संवाद झाला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही

अशोक खरात यांचे एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या कथित फोन कॉल्सवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल. केवळ फोनवर संवाद झाला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवर सावध भूमिका घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्यामध्ये काय तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल असा विश्वासही महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

Save Your Own MPs”: Girish Mahajan’s Sharp Retort to Sanjay Raut’s Claims

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment