Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Devendra Fadanavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बंगालमध्ये महापरिवर्तन; भाजपचा विजय भारतात होणारी घुसखोरी अन् हल्ल्यांपासून वाचवणारा

आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.

वि्शेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadanavis आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.Devendra Fadanavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो तिथल्या एका पत्रकाराने मला विचारले की ममता बॅनर्जी म्हणतात भाजप आणि त्याचे नेते हे बंगालच्या बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक येऊन इथे मत मागतात. यावर तुमचे मत काय? मी त्यांना सांगितले, आमच्या भाजपची निर्मिती ज्यांनी केली ते शामाप्रसाद मुखर्जीच बंगालचे आहेत. त्यामुळे खरा बंगालचा जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन नसुते परिवर्तन केले नाही, तर महापरिवर्तन केले आहे.Devendra Fadanavis



मोदी है तो मुमकिन है!

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंगाल असेल, आसाम असेल पुडूचेरी असेल हा विजय भारतातल्या जनतेचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे. जनतेला एकच गोष्ट माहीत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘मोदी है तो मुमकिन है!’. आणि म्हणून बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम 30 वर्ष कॉंग्रेस, 36 वर्ष कम्यूनिस्ट आणि या दोघांपेक्षा खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचे शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, या बंगालची अवस्था या सगळ्यांनी मिळून अशी केली की देशात येणारा जो एफडीआय आहे त्यातला अर्धा सुद्धा तिकडे जात नाही. बंगालमधून अनेक मोठे उद्योग निघून गेले. तिथे जंगलराज निर्माण झाले होते. त्यात माननीय मोदी यांनी बंगालचे जे व्हीजन मांडले आणि बंगालच्या जनतेत आशेचा किरण निर्माण केला.

बंगालचा विजय केवळ एका राज्याचा विजय नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंगालच्या जनतेला विकासकाम बघून विश्वास बसला आणि जर कोणी परिवर्तन घडवून आणू शकते तर ते फक्त मोदी आहेत. तो विश्वास जनतेने आज मतपेटीत दाखवला आहे. बंगालचा विजय केवळ एका राज्याचा विजय नाही. हा विजय भारतात होणारी घुसखोरी, भारतात होणारे हल्ले या सगळ्या गोष्टींपासून वाचवणारा हा विजय आहे. ज्या प्रकारे ममता दीदींच्या नेतृत्वातील सरकार बांगलादेशमधून घुसखोरी आणायचे, त्यांचे कागदपत्र तयार करून विविध राज्यांमध्ये पाठवायचे.

कितीही अत्याचार केला तरी भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही

या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले. आमच्या कार्यकर्त्यांचे डोळे फोडले, जाळून टाकले, कितीही अत्याचार केला तरी भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही हे दाखवणारा हा विजय आहे. आसाममध्ये जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून तिथली आतंकवादी गतिविधी थांबली. एकट्या भाजपला आसाममध्ये बहुमत मिळाले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“Maha-Poribortan”: Devendra Fadnavis Hails BJP’s Historic Bengal Victory

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment