Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

CM Fadnavis : आखाती देशांत अडकलेल्या लोकांना आणण्याचे प्रयत्न सुरू:फडणवीस म्हणाले- देशात तेलाचा 2 महिन्यांचा स्टॉक, किमती वाढणार नाहीत

केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.CM Fadnavis

परदेशातल्या लोकांना आणण्यासाठी आपण व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. केंद्र सरकारने दुतावासाशी संपर्क करायला सांगितले आहे. त्यानुसार आपण सर्व ते प्रयत्न करत असून, अडकलेल्या लोकांना परत आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच सध्या देशाकडे तेलाचा दोन महिन्यांचा स्टॉक आहे. त्यामुळे लगेच किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.CM Fadnavis



देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे अनेक लोक परदेशात अडकलेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्फलाइन सुरू केली गेली आहे. व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. त्यावर अनेकजण संपर्क साधत आहेत. त्यांना हळूहळू एअर इंडियाच्या विमानातून मायदेशात आणले जात आहे. परदेशातली मराठी मंडळे सक्रिय केली आहेत. स्वतः गिरीश महाजन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलले. त्याची जबाबदारी चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांच्याकडे दिली गेली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी या काळात का करावे, काय करू नये याच्या एसओपी त्यांना दिल्यात आहेत. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्याची व्यवस्था करणार होतो. मात्र, इतर राज्यांनी ही भूमिका घेतली, तर गोंधळ होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. आता केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला आलेले मेसेज, माहिती MEA ला कळवली जातेय. मिहीर कोटेचा यांनी दुबई अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार पूर्णपणे या बाबीवर लक्ष ठेवून आहे. लोकांची सुरक्षितता, त्यांना परत आणणे, याच्या उपाययोजना केल्या जात आहे. सर्व लोकांना परत आणले जाईल. राज्य सरकारही त्याचा पाठपुरावा करेल. तुम्हा कोणाकडे काही मसेज आल्यास आम्हाला कळवा. ते सुद्धा केंद्र सरकारपर्यंत पोहचवले जातील. त्यामुळे काही काळजी करू नका.

तेलाची आत्तातरी काळजी करू नये. ते केंद्र सरकार करते आहे. दोन महिन्याचा स्टॉक आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी सकाळीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे लगेच तेलाच्या किमती वाढतील वगैरे यात काही तथ्ये नाही. काही शेतमाल परदेशात अडकल्याचा उल्लेख येथे केला गेला. त्याबाबत आपल्याला काय करता येईल, ते केले जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

CM Fadnavis on Gulf Evacuation: WhatsApp Helpline Launched, 2-Month Oil Stock VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment