Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

दक्षिण – पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा झंझावात; पवारांच्या राष्ट्रवादीने रिकाम्या केलेल्या political space मध्ये शिरकाव!!

दक्षिण पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता. सांगली जिल्ह्यात काही प्रमाणात काँग्रेसची ताकद होती. पण नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. पवारांनी सुद्धा या निवडणुकीतला रस काढून घेतला त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली त्या पॉलिटिकल स्पेस मध्ये बाकी कुठल्याही पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त शिरकाव केल्याचे चित्र समोर आले.

नाशिक : दक्षिण पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता. सांगली जिल्ह्यात काही प्रमाणात काँग्रेसची ताकद होती. पण नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. पवारांनी सुद्धा या निवडणुकीतला रस काढून घेतला त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली त्या पॉलिटिकल स्पेस मध्ये बाकी कुठल्याही पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त शिरकाव केल्याचे चित्र समोर आले.Eknath Shinde’s storm in South-West Maharashtra; Entering the political space vacated by Pawar’s NCP!!

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात द्वैत निर्माण झाले ठाण्यात रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना कडून काही नेते भाजपमध्ये घेतले त्यामुळे शिंदे आणि भाजप यांच्या दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांवर मराठी माध्यमांनी लक्ष केंद्रित केले, पण त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातल्या political space मध्ये शिरकाव केल्याचे राजकीय वास्तव दुर्लक्षित झाले.



– सुप्रिया सुळे पिछाडीवर, श्रीकांत शिंदे आघाडीवर

एकीकडे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून दूर राहिल्या असताना एकनाथ शिंदेंची चिरंजीव श्रीकांत शिंदे मात्र प्रचारात आघाडीवर राहिले. मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन नगरपरिषदांमध्ये प्रचार सहभाग घेतल्या. ते अगदी विदर्भातल्या नागपूरपर्यंत जाऊन पोहोचले. पण सुप्रिया सुळे बारामतीतल्या सुद्धा प्रचारात सहभागी झाल्या नाहीत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शिंदेंच्या प्रचार सभा अशा ठिकाणी आयोजित केल्या की जिथे शिंदेंची शिवसेना जोर लावून लढते आहे. तो प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातला पट्टा आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. त्या पाठोपाठ पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राचा दौरा केला. यात त्यांनी विटा, कराड, फलटण, सातारा, महाबळेश्वर, संगमनेर आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा घेतल्या. त्यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आणि नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात जाऊन सुद्धा सहभाग घेतल्या.

– पवारांची माघार, शिंदेंचा एल्गार

एकेकाळी याच विभागावर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसची छाप होती. परंतु पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतून जवळपास माघार घेतली. पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस फार निवडक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करू शकली. या निवडणुकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी चिन्ह जवळपास गायब झाले. पण त्यांची political space अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भरण्यापेक्षा ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त भरली. त्यामुळे सगळीकडे कमळापाठोपाठ धनुष्यबाण जास्त ठिकाणचे चिन्ह ठरले. महायुतीतल्या स्पर्धेत भाजपच्या बरोबरीने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेला उभे केले. नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल काय लागायचा तो लागो, पण शिवसेना नावाचा पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्रात वाढतो आहे, हे चित्र मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी रीत्या निर्माण केले.

Eknath Shinde’s storm in South-West Maharashtra; Entering the political space vacated by Pawar’s NCP!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment