Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

मी जे करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून नाही; अशोक खरात प्रकरणावर एकनाथ शिंदेंचे उत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली. यावेळी विशेषतः गाजलेल्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना, “मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काहीही करत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली. Eknath Shinde

आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, मात्र तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर त्याचे ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ लिहिलेले नसते, अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू स्पष्ट केली.

खरात हा माणुसकीला काळिमा

एकनाथ शिंदे म्हणाले, मी करतो ते मोकळेपणाने करतो, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, दोन मंत्री होते, मीडियाही माझ्यासोबत होता. एका कार्यकर्त्याने सांगितले, आता कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलंय का? आपण काय कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो का? तसेच खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थारा देणार नाही. ती आमची वृत्ती नाही. खरातला त्याची सजा होणार, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.



माझा भर सकारात्मक कामावर

महायुतीमध्ये भाजपकडून अडथळे निर्माण केले जातात किंवा कोंडी केली जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती विजयी घोडदौड करत आहे. कुठे ना कुठे काही होतेच, पण माझा भर सकारात्मक कामावर आहे. तसेच उद्धव ठाकरे भाजपजवळ जात असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना शिंदे म्हणाले, मला काय फरक पडतो? पण त्यांना जवळ तर घ्यायला पाहिजे, असे उत्तर शिंदे यांनी दिले आहे.

‘मिसिंग लिंक’वर केले भाष्य

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा आढावा घेताना एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी लोकार्पण होणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ या ऐतिहासिक प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले आणि समृद्धी महामार्गाच्या निर्मितीदरम्यानच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. अभियांत्रिकीचा चमत्कार ठरणारा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प प्रवासातील वेळ, इंधन आणि अपघातांमध्ये मोठी बचत करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग आणि नवी मुंबई विमानतळासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारे असून, या नवीन पायाभूत सुविधांमुळे दीड तासांचा प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी अभिमानाने नमूद केले.

Eknath Shinde’s Response to the Ashok Kharat Case

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment