विशेष प्रतिनिधी
पुणे : Pradeep Kurulkar पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.Pradeep Kurulkar
“हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी महिला हेरास देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकर याच्याविरोधात शासकीय गुपिते अधिनियमाच्या कलमांनुसार मुंबई येथील काळाचौकी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर डॉ. कुरुलकरला दहशतवादविरोधी पथकाने ४ मे २०२३ ला अटक केली होती. या प्रकरणात एटीएसने ३० जून २०२३ रोजी दोन हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. त्यामध्ये डॉ. कुरुलकर व दासगुप्ता यांच्या चॅटिंगमधून संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड झाले होते.
Espionage Case: Charges Framed Against Ex-DRDO Director Pradeep Kurulkar
महत्वाच्या बातम्या
- JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली
- US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद
- Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर
- शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!


Post Your Comment