Trending News

No trending news found.

Saturday, 20 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sanjay Raut : उबाठाच्या वर्धापन दिनी राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.Sanjay Raut

आदित्य ठाकरेंनीच डाव उधळला

नवनाथ बन म्हणाले की, ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. मंचावर केवळ आदित्य ठाकरेंचा आदेश चालला आणि राऊत हे फक्त मूक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले.”Sanjay Raut



 

राऊतांची किंमत घटली, अस्वस्थता वाढली

राऊतांच्या पक्षातील स्थानावर बोट ठेवताना भाजप प्रवक्ते पुढे म्हणाले, “ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिनातच बाजूला बसवण्याची वेळ आली. यावरून उबाठामधील त्यांची घटती किंमत आणि वाढती अस्वस्थता स्पष्ट होते. कालपर्यंत संपूर्ण पक्षाला रिमोटने चालवण्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा स्वतःचाच रिमोट आदित्य ठाकरे यांनी काढून घेतल्याचं दिसलं.

आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत सामना?

वर्धापन दिनाच्या या संपूर्ण घडामोडींवरून ठाकरे गटात दोन तट पडल्याचे सांगत बन यांनी शेवटी लिहिले की, “यातून आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत या सामन्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.” ६ खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या या थेट टिप्पणीमुळे आता ठाकरे गट आणि संजय राऊत यावर काय पलटवार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“Aaditya Thackeray Muted Sanjay Raut”: BJP Jibe on UBT Foundation Day

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment