Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sunil Tatkare : मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, सुनील तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा

अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.

शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला होता की, “खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवंगत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांवर सुनील तटकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत रोहित पवारांवर पलटवार केला.



रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना तटकरे म्हणाले, “माझ्यावर टीका होणे ही काही नवीन गोष्ट नाही. २०१४ सालापासून मला सातत्याने टार्गेट केले जात आहे. मात्र, मी कायम अजितदादांसोबत होतो. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय असो किंवा पक्षाची पुढील रणनीती, आम्ही सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे होतो. अजितदादांनी राज्याच्या राजकारणात मिळवलेली पकड आणि त्यांची उंचावलेली प्रतिमा यात आमचाही खारीचा वाटा होता. रोहित पवार प्रसिद्धीसाठी मला टार्गेट करत आहेत.”

सुनील तटकरे यांनी यावेळी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांना ‘शांत’ राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे पार्थिव हॉस्पिटलला आणल्यापासून ते पोस्टमॉर्टमपर्यंत नेमके काय काय घडले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया थांबा, अन्यथा भविष्यात मला अनेक गोष्टी जाहीर कराव्या लागतील.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तटकरे नेमक्या कोणत्या ‘गुपितां’बद्दल बोलत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

सुनील तटकरे यांनी केवळ पक्षावरच नाही, तर पवार कुटुंबातील सदस्यांविरुद्ध सुरू असलेल्या हालचालींवरही भाष्य केले. “सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात तुम्ही काय कटकारस्थान रचत होता, याची माहिती आमच्या सर्वांकडे आहे. आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करायचे आहे, त्यामुळे ज्याला हा इशारा आहे त्याने तो समजून घ्यावा आणि वेळीच थांबावे,” असेही तटकरे यांनी निक्षून सांगितले.

Don’t cross the limit, otherwise I will have to open my mouth, Sunil Tatkare warns Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment