Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे दोन आठवड्यांपासूनच लक्ष; पुरावे गोळा करूनच केली धडक कारवाई!!

भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात धडक कारवाईच्या बातम्या आज जरी आल्या असल्या, प्रत्यक्षात राज्याच्या गृह मंत्रालय आधीपासूनच सतर्क होते.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात धडक कारवाईच्या बातम्या आज जरी आल्या असल्या, प्रत्यक्षात राज्याच्या गृह मंत्रालय आधीपासूनच सतर्क होते. या गंभीर प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती आता समोर आली.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडीओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अशोक खरातविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

– अशोक खरातच्या अटकेचा थरार

नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेनं खरातविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं खरातच्या घरावर छापा टाकत थरारक कारवाई केली. पण अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो, या शक्यतेमुळे पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला होता. पोलिसांनी खरात राहत असल्याच्या परिसरात चोर शिरल्याचं कारण देत कारवाई सुरू केली, त्यामुळे अशोक खरात याच्यासह कुणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक अशोक खरातच्या घरात शिरले, तर दुसरे पथक घराबाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन ताब्यात घेतले.

– रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असली तरी, मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली. दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय?, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केली, तरी राष्ट्रीवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली.

Devendra Fadnavis has been keeping a close watch on the ‘Fake Baba’ Ashok Kharat case for the past two weeks.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment