Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Dada Bhuse : 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; दोषी पर्यवेक्षकांसह केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा संताप

विशेष प्रतिनिधी मुंबई : Dada Bhuse  राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना चक्क कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे तसेच दोषी पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Dada Bhuse बारावीच्या परीक्षा केंद्रांना सीसीटीव्ही आणि इतर मूलभूत सुविधांचे कडक निर्देश देऊनही कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे […]

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dada Bhuse  राज्यात 10 फेब्रुवारीपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर खुद्द अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना चक्क कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे तसेच दोषी पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Dada Bhuse

बारावीच्या परीक्षा केंद्रांना सीसीटीव्ही आणि इतर मूलभूत सुविधांचे कडक निर्देश देऊनही कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. ज्या केंद्रांवर असे गैरप्रकार घडले आहेत, त्यांची मान्यता तातडीने रद्द करण्यात येणार असून भविष्यात त्यांना परीक्षा केंद्र म्हणून पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. केवळ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवरच नाही, तर या प्रक्रियेत सामील असलेले केंद्र प्रमुख आणि संबंधित पालकांवरही कायदेशीर बडगा उगारला जाणार असून, नियमावलीचे पालन न करणाऱ्या शाळांनाही या कारवाईतून सुटता येणार नाही, असे दादा भुसे यांनी स्पष्टपणे बजावले आहेDada Bhuse



राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेत महसूल, गृह आणि ग्रामविकास विभागाचे सक्रिय सहकार्य घेतले जात असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात असल्या तरी, ज्या केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार समोर येतील, तिथे कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही भुसे यांनी दिला आहे.

बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी: कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित

जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांसह बैठ्या पथकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात खासगी शिक्षणसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. केंद्रावर 14 वर्गांमध्ये 370 विद्यार्थी होते.

सामूहिक कॉपी प्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निर्णय बोर्ड घेईल, अशी माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी काल दिली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली.

HSC Exam Mass Copying: Education Minister Dada Bhuse Orders Strict Action

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment