Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

थलपती विजयला काँग्रेसचा पाठिंबा; अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम देखील पाठिंबा द्यायच्या तयारीत!!

तामिळनाडूत थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याबरोबर त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी धडपड सुरू झाली.

वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूत थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याबरोबर त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी धडपड सुरू झाली. काँग्रेसने थलपती विजयला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांनी विजय यांना भेटून काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा जाहीर केला. थलपती विजयचा सत्कार केला.

अण्णाद्रमुकचे अस्तित्व टिकवण्यासाठी इडापड्डींच्या गेमा; थलपती विजयला पाठिंबा, अन्यथा अण्णाद्रमुक फुटण्याचा धोका!!

अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच इडापड्डी पलानीस्वामींच्या गेमा; थलपती विजयला पाठिंबा, अन्यथा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष फुटण्याचा धोका!!, हे राजकीय चित्र आज तामिळनाडूतून समोर आले.

थलपती विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला तामिळनाडू मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांचे 108 आमदार निवडून आले पण दहा आमदार बहुमतासाठी कमी पडले. त्यामुळे थलपती विजय याला पाठिंबा देण्यासाठी नेमके कोण तयार आहे याविषयी राजकीय चढाओढ सुरू झाली.

याच पार्श्वभूमीवर इडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामध्ये फूट पडेल आणि त्या पक्षाचे 30 आमदार विजयच्या सरकारला पाठिंबा देतील अशी बातमी सगळीकडे पसरली. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम चे 47 आमदार निवडून आलेत. त्यापैकी 30 आमदार फुटले तर पक्ष धोक्यात येतो हे लक्षात घेऊन इडापड्डी यांनी राजकीय गेमा सुरू केल्या. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी विजयची भेट घेतली.

Congress extends support to Thalapathy Vijay.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment