Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!, असेच चित्र आज नागपूरात दिसले.

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!, असेच चित्र आज नागपूरात दिसले. Congress and Vanchit Aghadi

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमवली होती. जनतेने सुद्धा मोर्चाला चांगला प्रतिसाद दिला. अमेरिकेतल्या एपस्टीनच्या फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्याने त्यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अधिकार नाही. एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा चारित्र्यसंपन्नतेची भाषा करतो पण नरेंद्र मोदींना मात्र पंतप्रधान पदावरून हटवत नाही, ही दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.



 वंचित बहुजन आघाडीच संघाविरुद्ध आघाडीवर

संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चा संदर्भात वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून भरपूर प्रचार केला पण काँग्रेसने मात्र तेवढ्या प्रमाणात या मोर्चाला आपल्या सोशल मीडिया हँडवरून प्रसिद्धी दिली नाही.

ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी मोर्चा पासून दूर

शिवाय आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेच बहुसंख्येने सामील झाले, पण ज्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एक मोठा घटक पक्ष म्हणून आहे, त्या महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे आजच्या संघ मुख्यालयावरच्या मोर्चा पासून दूर राहिले. ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी यांचे नेते आणि कार्यकर्ते आजच्या मोर्चाकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढताना काँग्रेस महाविकास आघाडीत एकाकी पडली. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत नव्हतीच त्यामुळे ती एकाकी पडण्याचा प्रश्न उद्भवला नाही उलट काँग्रेसच्या साथीने वंचित बहुजन आघाडीने संघाविरुद्ध खऱ्या अर्थाने लढा उभारल्याचे चित्र आजच्या मोर्चाच्या निमित्ताने समोर आले.

– पवारांच्या खासदारकीशी भाजपच्या संबंधाचे गूढ

पण एरवी संघाच्या विचारसरणीच्या विरोधात मोठा चालवणारे narrative चालविणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते या संघ विरोधातल्या मोर्चापासून दूर का राहिले??, हा सवाल मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात तरंगत राहिला. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकल्यामुळे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी बिनविरोध मिळवता आली, म्हणून तर आजच्या संघ विरोधातल्या मोर्चा पासून शप राष्ट्रवादी दूर तर राहिली नसेल ना??, असा सवालही या निमित्ताने चर्चेत आला. पण त्याचे राजकीय रहस्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही नेत्याने उघडपणे सांगितले नाही.

Congress and Vanchit Aghadi Join Forces for March on RSS Headquarters

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment