Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने केलेल्या गोदा आरतीला कम्युनिस्ट आणि वंचितचा विरोध; पण TCS मधल्या कॉर्पोरेट जिहाद वर तोंडे गप्प!!

नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोदावरी आरती केली, तर त्या उपक्रमाला कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध करून पाहिला. शेवटी पोलीस बंदोबस्तात आंबेडकर जयंतीची गोदावरी महाआरती करावी लागली.

नाशिक : नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोदावरी आरती केली, तर त्या उपक्रमाला कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध करून पाहिला. शेवटी पोलीस बंदोबस्तात आंबेडकर जयंतीची गोदावरी महाआरती करावी लागली. Godavari aarti

पण गोदावरी महाआरतीला विरोध करणाऱ्या कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी टाटा कन्सल्टींग सर्व्हिसेस (TCS) मध्ये घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद वर तोंड उघडले नाही.

– गोदावरी महाआरतीला विरोध

नाशिक मध्ये काल रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने तथागत आणि गोदावरी महाआरतीचे आयोजन केले होते. त्या आरतीला सर्व नाशिककरांनी उपस्थिती लावली. पण या आरतीच्या आयोजनापूर्वीच नाशिक मधले कम्युनिस्ट नेते कॉम्रेड राजू देसले आणि निरंजन टकले यांनी विरोध केला. राजू देसले यांनी गोदावरी आरतीच्या विरोधात व्हिडिओ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तत्वांच्या विरोधात ही महाआरती असल्याचा दावा केला. वंचित बहुजन आघाडीने तर थेट पोलिसांनाच आंबेडकर जयंती निमित्त होणारी महाआरती रोखण्यासाठी निवेदन दिले. त्यामुळे पोलिसांना महाआरतीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवावा लागला.



– कॉर्पोरेट जिहाद वर तोंडे गप्प

पण गोदावरीच्या महाआरतीला विरोध करणाऱ्या कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी नाशिक मधल्याच TCS कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद वर साधे तोंड सुद्धा उघडले नाही. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (TCS) सारख्या नामांकित कंपनीत मुलींचा धार्मिक छळ झाला. त्यांच्या वर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. त्या मुलींची मलेशियाला विक्री करायचा कट रचण्यापर्यंत इस्लामी जिहाद्यांची मजल पोचली होती‌. तिथल्या कॉर्पोरेट जिहादचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या नेटवर्कशी जोडल्याचे पोलीस तपासातून बाहेर आले. कंपनीतल्या ७ जिहादी तरुणांना अटक झाली. नाशिक मध्ये एवढे सगळे गंभीर प्रकरण घडले, ज्याचा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावरून मराठी माध्यमे गप्प बसलीच. पण गोदावरी आरतीला विरोध करणारे कम्युनिस्ट आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुद्धा मूग गिळून गप्प बसले. त्यांना कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचे बिलकुल गांभीर्य वाटले नाही. त्यांना त्यातला धोका सुद्धा ओळखता आला नाही.

– कम्युनिस्टांची भूमिका दुटप्पी

एरवी कम्युनिस्ट लोक कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेकडो मैलांचे मोर्चे काढतात. त्यात हजारो महिलांना सुद्धा सहभागी करून घेतात, पण कॉर्पोरेट जिहाद मधून महिलांच्या मूलभूत अधिकारावर गदा आली किंबहुना त्या महिलांचा लैंगिक आणि धार्मिक छळ झाला, तरीसुद्धा नाशिकच्या कम्युनिस्ट लोकांना जाग आली नाही आणि त्यांना कॉर्पोरेट जिहादचा निषेध सुद्धा करावासा वाटला नाही. फक्त गोदावरी आरती वर आक्षेप नोंदवावासा वाटला. पण त्यातून कम्युनिस्टांची दुटप्पी भूमिकाच उघडी पडली.

Communist and VBA opposed Godavari aarti, but kept mum over TCS corporate Jihad

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment