Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : कदाचित 3 महिन्यांनी LPG बंद होईल; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे मोठे विधान; PNG गॅसच्या जोडण्या वाढवण्यावर दिला भर

राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Chhagan Bhujbal  राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत.Chhagan Bhujbal

नवी दिल्लीत आज केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच एका निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी वरील विधान केले.Chhagan Bhujbal



पीएनजीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर

भुजबळ म्हणाले, देशातील निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी व मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. त्यांनी सर्वच राज्याचे मंत्री व सचिवांना काही सूचना केल्या. त्यानुसार, पीएजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे.

केंद्र सरकारच्या एका पत्रकात कदाचित 3 महिन्यांनी एलपीजी बंद होईल असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी यासंदर्भात काम करणे शक्य आहे, तिथे ते सुरू केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजे. पाण्याचे व वीजेचे कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी दिली जाते. त्याप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे.

आपल्याला पीएनजी जोडण्या लवकरात लवकर करायच्या आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी विविध विभागांना परवानग्या मागितल्या जातात. पीएनजी मिळाली असे समजावे. या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना 24 तास परवानगी राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पेट्रोल पंपांवरही मिळणार केरोसीन

छगन भुजबळांनी यावेळी गॅस टंचाईमुळे केरोसीनचा अधिकाधिक वापर करण्यावरही भर दिला. ते म्हणाले, राज्य सरकारकडे केरोसिन उपलब्ध होते. पण आपण ते देऊ शकत नव्हतो. कारण, उच्च न्यायालयाने त्यावेळी एक आदेश दिला होता. आता आपण न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार, जिथे एलपीजी व पीएनजीचा कमी आहे, तिथे केरोसीनचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ज्या जुन्या डिलर्सच्या परवान्यांचे नुतनीकरण प्रलंबित होते, त्यांनी ते झाले असे समजून कामाला लागावे. या प्रकरणी पेट्रोल पंपावर केरोसीनचे टँकर उभे करून तेथून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भुजबळ म्हणाले.

LPG Supply May Stop in 3 Months: Chhagan Bhujbal Urges Switch to PNG

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment