Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

ज्या इडापड्डींचे ऐकून भाजपच्या नेतृत्वाने अण्णामलाईंना दूर सारले, त्या इडापड्डींची AIADMK फुटली; इडापड्डींचे पक्षावरचे नियंत्रण संपले!!

ज्या इडापड्डींचे ऐकून भाजपच्या नेतृत्वाने अण्णामलाईंना दूर सारले, त्या इडापड्डींची AIADMK फुटली; इडापड्डींचे पक्षावरचे नियंत्रण संपले.

नाशिक : ज्या इडापड्डींचे ऐकून भाजपच्या नेतृत्वाने अण्णामलाईंना दूर सारले, त्या इडापड्डींची AIADMK फुटली; इडापड्डींचे पक्षावरचे नियंत्रण संपले. तामिळनाडूच्या राजकारणात एक नाही, तर दोन एकनाथ शिंदे तयार झाले. आमदार एस. पी वेलुमणी आणि आमदार जी. हरी यांनी AIADMK पक्षात फूट घडवून आणली. AIADMK पक्षाच्या ४७ पैकी बहुसंख्य आमदारांनी वेलुमणी यांची AIADMK पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली, तर हरी यांची उपनेते पदावर निवड केली. या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सरकार सध्या तरी स्थिर झाले. हे सगळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने इडापड्डींचे ऐकून अण्णामलाईंना दूर सारल्यामुळे घडून आले. CV Shanmugam



– AIADMK फुटली

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने इतरांना धक्का देत बाजी मारली. अण्णामलाईंनी मशागत केलेल्या राजकीय जमिनीवर मोठ्या यशाचे पीक काढले. पण तामिळ जनतेचा कौल नाकारून AIADMK चे नेते इडापड्डी पलानीस्वामी यांनी DMK बरोबर हातमिळवणी करून मुख्यमंत्री होण्याचा डाव टाकला. पण तो त्यांच्याच अंगलट आला. इडापड्डींना सरकार स्थापन करायला DMK पाठिंबा तर मिळाला नाहीच, उलट AIADMK पक्षातल्या आमदारांचा विश्वास गमवावा लागला. AIADMK च्या बहुसंख्य आमदारांनी DMK बरोबर जायला नकार दिला. त्यामुळे AIADMK पक्षातच फूट पडली. इडापड्डी पलानीस्वामी हेच AIADMK पक्षात अल्पमतात आले. AIADMK च्या आमदारांनी सी. व्ही. षणमुखम यांचे नेतृत्व प्रस्थापित केले. इडापड्डी पलानीस्वामी यांना दूर सारले. सगळा पक्षच ताब्यात घेतला. AIADMK मध्ये फूट पाडण्याचा प्रश्नच नसल्याचे निवेदन आमदार वेलुमणी यांनी केले. तामिळनाडूतले लॉटरी किंग मार्टिन यांच्या पत्नी AIADMK च्या आमदार लिमा रोज यांनी पक्षात फूट घडवून आणण्यासाठी आणि विजय जोसेफ यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

– इडापड्डींचे फासे उलटे पडले

इडापड्डी पलानीस्वामी यांचे सगळेच राजकीय फासे उलटे पडले. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून अण्णामलाईंना तामिळनाडूच्या राजकारणातून दूर सारायला लावले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने इडापड्डींवर अतिरिक्त विश्वास ठेवून अण्णामलाईंना दूर सारले. त्याचाच अप्रत्यक्ष राजकीय लाभ विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाला झाला. DMK सरकारच्या विरोधात तामिळनाडूत प्रचंड असंतोष होता. पण त्याचा लाभ इडापड्डींना घेता आला नाही. त्यांनी फक्त भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्यात धन्यता मानली. पण तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांचे सरकार आल्यानंतर इडापड्डींना स्वतःच्या AIADMK पक्षावर सुद्धा नियंत्रण ठेवता आले नाही त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी इडापड्डींचे नेतृत्व बाजूला सारले.

– भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा अंदाज चुकला

पण इडापड्डींचे राजकीय महत्त्व आणि राजकीय ताकद एवढी कमी आहे. आपण त्यांचे ऐकायलाच नको होते, याचा अंदाज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आला नाही. त्यामुळे तामिळनाडूतले सगळे राजकारण फिरले. अन्यथा तिथे अण्णामलाई यांचे विशिष्ट वर्चस्व प्रस्थापित होऊ शकले असते.

Chennai, Tamil Nadu: AIADMK leader CV Shanmugam says, “Edappadi K Palaniswami

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment