Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप; आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला संपवण्याचे कारस्थान

राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Bachchu Kadu राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.Bachchu Kadu

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या चुलत बंधूंना, म्हणजेच अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी सक्रिय असलेल्या 40 वर्षीय अभिजीत तायडे यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली असून, राजकीय वैमनस्यातून आपल्याला संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा तायडे बंधूंनी या तक्रारीत केला आहे.Bachchu Kadu



 

ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सोपवली

तक्रारीनुसार, गेल्या डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरे आणि इतरांनी मिळून अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याचा कट रचला होता. एका गोपनीय साक्षीदाराने या संवादाचे रेकॉर्डिंग केले असून, त्या संभाषणाचा पुरावा असलेला पेन ड्राईव्ह तक्रारदाराने पोलिसांकडे सोपवला आहे. तसेच आमदार प्रवीण तायडे विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे ही तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

प्राप्त तक्रार आणि पेन ड्राईव्हमधील प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 55, 58 आणि 61 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली ऑडिओ क्लिप आणि त्यातील संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून, त्याद्वारे तांत्रिक पुराव्यांची खातरजमा केली जाणार आहे.

पुढील तपास सुरू

या संवेदनशील प्रकरणामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, सध्या चांदूर बाजार पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

कट रचणे हा आमचा धंदा नाही- बच्चू कडू

गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कट रचणे हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक आहोत. कोणाचा जीव घेणारे लोक नाही. मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला गेला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर दीड लाख रुपये मिळावे यासाठी आता मी आंदोलन करणार होतो. कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, अशा पद्धतीने जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वतःहून अटक होऊ, प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून आम्ही अटक करून घेऊ. मी उद्यापासून एव्हरेस्ट बेस कॅम्पला चाललो आहे. देवाचीच अकृपा झाली तर आम्ही काय करणार? सत्ता तुमची, एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅब तुमची. कट रचणे हा आमचा धंदा नाही, असे कडू यांनी म्हटले आहे.

Conspiracy to Murder Plot: FIR Against Bachchu Kadu for Targeting MLA’s Brother

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment