Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध आणखी 11 महिलांकडून शोषणाची तक्रार; पोलिस आवाहनास प्रतिसाद

नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.Ashok Kharat

या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात ‘ऊर्जा’, ‘मनःशांती’ आणि धार्मिक पूजांच्या नावाखाली महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. अनेक पीडित महिलांचे कोणतेही व्हिडिओ व्हायरल झाले नसले तरी इतर तांत्रिक पुरावे आणि मानसिक दबावाचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. समाजातील बदनामीच्या भीतीमुळे या महिला आतापर्यंत गप्प होत्या, मात्र पोलिसांच्या आवाहनानंतर त्यांनी धैर्य दाखवत तक्रार नोंदवली.Ashok Kharat



या प्रकरणात आधीच लैंगिक शोषणाचे आठ गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) ने काम सुरू केले असून २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम यासाठी कार्यरत आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून पुढील ६० दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने स्वतंत्र तपास सुरू करत १०० हून अधिक दस्तऐवज गोळा केले आहेत. तसेच खरातशी संबंधित ५७ खातेदारांपैकी काहींची चौकशीही करण्यात येत आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात महिलांची वैयक्तिक माहिती आधीच गोळा करत असे. त्यानंतर ‘पतीचा मृत्यू अटळ आहे’ अशी भीती दाखवून त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत केले जात होते. काही दिवसांनी ‘विशेष पूजा’ करण्याच्या नावाखाली त्यांना एकांतात बोलावून घेऊन अत्याचार केला जात होता. पूजा करताना मंत्र म्हणायला लावणे, डोळे बंद ठेवायला सांगणे आणि ‘देवाची ऊर्जा देतो’ असे सांगून तो आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही उघड झाले आहे.

सध्या खरात पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जात आहे. आणखी काही लोक या जाळ्यात सामील होते का, याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

11 More Women Report Abuse by Nashik’s Ashok Kharat; SIT Probe Intensifies

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment