Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Anjali Damania : या, चहा प्या आणि CDR कसा काढला ते पाहा; अंजली दमानियांचे राऊत, अंधारेंना आमंत्रण

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. "सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या," असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Anjali Damania  भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. “सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या,” असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.Anjali Damania

अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या सीडीआरचा हवाला देत काही नेत्यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हा डेटा मिळवणे बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोधकांनी दमानिया यांचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी जोडला होता.Anjali Damania



नेत्यांना चहाचे निमंत्रण आणि ‘एआय’चे प्रात्यक्षिक

अंजली दमानिया यांनी खरातचे कॉल डिटेल्स शोधून काढल्यानंतर त्यांच्यावर भाजपशी संबंधित असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना दमानिया यांनी ट्वीट करत संजय राऊत, सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना उद्या सकाळी १० वाजता आपल्या घरी चहासाठी बोलावले आहे.

नेमके काय म्हणाल्या दमानिया?

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा. मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले तेही पाहा. इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल, ते तुमच्यासमोर शोधून, त्यात इनकमिंग, आऊटगोईंग आणि कॉल समरी कशी येते, ते तुम्ही पाहा.”

“सुषमा अंधारे, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण आहे. मात्र, ह्यानंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला पोलिस महासंचालकांकडे वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांनाही माहिती देणार आहे,” असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

सीडीआर संदर्भात काय म्हणाले फडणवीस?

दुसरीकडे, खासगी व्यक्तीकडे कॉल डिटेल्स कसे आले, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. “सीडीआर मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांनाच असतो. कोणत्याही खासगी व्यक्तीला तो अधिकार नाही. त्यामुळे अंजली दमानिया यांच्याकडे हा डेटा कोठून आला, याची सखोल चौकशी केली जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दमानिया यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलिस महासंचालकांची भेट मागितली आहे.

दमानियांच्या उद्याच्या प्रत्याक्षिकाकडे लक्ष

दरम्यान, आता उद्या सकाळी अंजली दमानिया यांच्या घरी हे नेते चहासाठी जाणार का आणि ‘Claude’ एआयच्या माध्यमातून खरंच कॉल डिटेल्स काढता येतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे तंत्रज्ञान आणि गोपनीयता या विषयावरही नवी चर्चा सुरू झाली आहे.

“Come for Tea, See the CDR Proof”: Anjali Damania Invites Raut and Andhare

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment