Trending News

No trending news found.

Sunday, 19 April
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Amruta Fadnavis : मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती; नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. "मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती," असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amruta Fadnavis  नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती,” असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.Amruta Fadnavis

अमृता फडणवीस यांना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “कॉर्पोरेट क्षेत्रात अशा घटना घडत असल्याचे पाहून मला खूप खेद वाटतो. मी जेव्हा बँकेत होते, तेव्हा माझ्यासमोर अशी काही प्रकरणे आली होती. काही पुरुषांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या प्रकरणांची तक्रार झाल्यानंतर वरिष्ठांनी तात्काळ संबंधितांवर कठोर कारवाई केली होती.” अशा घटना घडल्यानंतर त्या लपवून न ठेवता वरिष्ठांना सांगणे गरजेचे आहे, तरच हे प्रकार थांबतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.Amruta Fadnavis



‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी संस्कृतीचे शिक्षण हवे

धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांवर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ही प्रकरणे अतिशय भयानक आहेत. “आपल्या मुलींनी या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम केले, तर अशा घटनांना आळा बसेल. आजचे तरुण सध्या संभ्रमात आहेत, कारण त्यांना आपल्या पुराण आणि वेदांची पुरेशी माहिती नाही. आपण त्यांना भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून ते भरकटणार नाहीत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

भोंदू अशोक खरातला कडक शिक्षा व्हावी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. “खरातने आपली बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी केला, हे अतिशय दुःखद आहे. या प्रकरणात सध्या कडक कारवाई सुरू आहे. प्रत्येक स्त्रीची हीच मागणी आहे की, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी,” असे अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

‘नारीशक्ती वंदन’ कायद्याचे स्वागत

संसदेत चर्चेत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर (नारीशक्ती वंदन कायदा) बोलताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. “हा कायदा पारित व्हावा ही प्रत्येक महिला आणि पुरुषाची इच्छा आहे. राजकारणात महिलांची टक्केवारी वाढणे काळाची गरज आहे. स्त्रियांना समान संधी मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. पंतप्रधान महिलांचे भले करण्यासाठी जे पाऊल उचलत आहेत, त्यात कोणताही स्वार्थ नसून तो महिलांचा हक्क आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Amruta Fadnavis Shares Banking Career Ordeals Amid Nashik TCS Scandal

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment