Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Ajit Pawar Crash : अजित पवार विमान अपघात चौकशीला वेग; ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटा डाऊनलोड करण्यात यश

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली होती 28 जानेवारी रोजी. त्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. तसेच हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, अपघातामागची नेमके कारणं काय आहेत? असे विविध प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार या विमान अपघताचा तपास सुरू करण्यात आला असून याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar Crash महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली होती 28 जानेवारी रोजी. त्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. तसेच हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, अपघातामागची नेमके कारणं काय आहेत? असे विविध प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार या विमान अपघताचा तपास सुरू करण्यात आला असून याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.Ajit Pawar Crash

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, याआधी 17 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रकाला अनुसरून नागरी विमानवाहतूक मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट करत आहे की, बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लिअरजेट 45 (VT-SSK) च्या अपघाताची चौकशी ‘विमान अपघात तपास संस्थे’मार्फत, विमान (अपघात व इतर दुर्घटनांसंबंधित तपास) नियमावली, 2025 ला, तसेच ICAO परिशिष्ट 13 मधील प्रमाणित व शिफारस केलेल्या पद्धतींना (SARP) अनुसरून सुरु असल्याची माहिती आहे.Ajit Pawar Crash



या विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर अस्तित्वात होते. L3 कम्युनिकेशन्स या कंपनीने उत्पादन केलेल्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील माहिती विमान अपघात तपास संस्थेच्या नवी दिल्लीतील कार्यालयात यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आली आहे. उच्च तापमानामुळे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरचे (CVR) मोठे नुकसान झाले आहे. त्याचे उत्पादन हनीवेल कंपनीने केले असल्याने ICAO परिशिष्ट 13 च्या जोडणी D व परिच्छेद 5.7 नुसार स्टेट ऑफ डिझाईन/मॅन्युफॅक्चर कडून तांत्रिक साहाय्याची मागणी केली गेली आहे.

तसेच विमान अपघात तपास संस्थेचा तपास हा तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित आहे. याअंतर्गत विमानाचे अवशेष, कार्यान्वयन आणि देखभाल दुरुस्तीच्या नोंदींची पद्धतशीर तपासणी, तसेच आवश्यकतेनुसार विमानांच्या घटकांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा अंतर्भाव असतो. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांनुसार, घटनेच्या 30 दिवसांच्या आत एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर योग्य वेळी अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विमान सेवा देणार्‍या कंपनीसंबंधीचे (ऑपरेटर) नियामक पर्यवेक्षण

2025 या वर्षात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने बिगर सूचित (non-scheduled) विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची 51 नियामक लेखापरीक्षणे केली आहेत. याव्यतिरिक्त, मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीची अनेक वेळा उड्डाण सुरक्षा प्रणाली, उड्डाण कर्तव्य वेळेची मर्यादा, देखभाल नियमांचे पालन (CAR M आणि CAR 145), दस्तऐवजीकरण आणि विमानतळ सुविधा यांसारख्या विविध बाबींशी निगडीत संनिरीक्षणे करण्यात आली आहेत. संनिरीक्षणात आढळलेल्या सर्व बाबींची दखल घेण्यात आली आणि ते पूर्ण करण्यात आले.

अपघातानंतरचे विशेष ऑडिट

अपघातानंतर मंत्रालयाने डीजीसीएला, नियामक अनुपालन, ऑपरेशनल कंट्रोल सिस्टम, देखभाल पद्धती, कर्मचारी प्रशिक्षण मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली तसेच सीव्हीआर/एफडीआर देखरेखीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी, मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे निर्देश दिले. हे परीक्षण 04 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले असून लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निष्कर्षांचा आढावा घेऊन डीजीसीएच्या अंमलबजावणी धोरण आणि कार्यपद्धती मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल.

याशिवाय, मंत्रालयाने डीजीसीए’ला व्हीआयपी/व्हीव्हीआयपी सेवांमध्ये असलेल्या इतर प्रमुख नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि विमानतळांचेही विशेष लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. ही परिनिरीक्षणे टप्प्याटप्प्याने केली जात असून आवश्यकतेनुसार योग्य अंमलबजावणी कारवाई केली जाईल.

तर्कवितर्कांना बळी न पडण्याचे आवाहन

मंत्रालय आणि त्याच्या नियामक संस्था पारदर्शकता, सुरक्षा देखरेख आणि जबाबदारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. सर्व संबंधितांनी कोणत्याही प्रकारच्या तर्कवितर्कांना बळी न पडता वैधानिक चौकशी आणि नियामक प्रक्रिया स्थापित नियमानुसार पार पडू द्याव्यात, अशी विनंती करण्यात येत आहे.

Ajit Pawar Crash Investigation: Black Box Data Successfully Downloaded

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment