Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!

सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.

नाशिक : सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने झाली. या सभेला जवळपास सर्वच पक्षांचे नेते हजर राहिले. त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांचा सुद्धा समावेश होता. छगन भुजबळ यांचे भाषण सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांचे स्टेजवर एन्ट्री झाली. भुजबळांच्या भाषणानंतर लगेच सुप्रिया सुळे यांनी भाषण केले.



– अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे भावूक

सुप्रिया सुळे यांच्या भाषणामध्ये भावनांचा महापूर होता. त्यांनी अजित पवारांच्या अनेक आठवणी सांगितल्या. काटेवाडीत जाऊन आशा काकींची भेट घेतल्याचे सांगितले. आशा काकींच्या जवळ अजित पवारांचा विषय काढायचे आपले हिंमत झाली नाही. त्याऐवजी आपण आपल्या मुलीच्या लग्नाचा विषय काढून त्यांच्याशी बोललो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती आणि पवार कुटुंबीयांच्या अतूट नात्याचे त्यांनी भरपूर वर्णन केले. दादांची आन, बान आणि शान करून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व नेते सुनेत्रा पवारांच्या उभे राहिल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

– सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर फडणवीसांचे आगमन

सुप्रिया सुळे यांच्या भाषणाच्या वेळी स्टेजवर सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री, उदय सामंत हे सगळे नेते हजर होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोपर्यंत आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होण्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांचे भाषण आटोपले. भाषण करून त्या स्टेजवरून निघून गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेजवर आगमन झाले.

A Flood of Emotion in Supriya Sule’s Speech

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment