Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार, अन्यथा निवडणूकच होऊ देणार नाही; NCP नेत्याची दमबाजी!!

नाशिक : NCP म्हणजे दमबाजी – दमदाटी हे समीकरणच जणू बनले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सोडून वेगळेच ते समीकरण उदयाला आलेले दिसले. महाराष्ट्रात अजित पवार, रोहित पवार यांच्यापासून अधून मधून सुप्रिया सुळे आणि अन्य राष्ट्रवादीचे नेते दमदाटीची भाषा करत असतात. नेमकी तीच सवय NCP नाव धारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना लागली असल्याचा प्रत्यय आता महाराष्ट्राच्या पलीकडे किंबहुना भारताच्या पलीकडे बांगलादेशात यायला लागला. बांगलादेश मधल्या नॅशनल सिटीजन पार्टीने म्हणजेच NCP ने एक अजब आग्रह धरला. त्यांना म्हणे, बांगलादेशातली निवडणूक कमळ म्हणजे शिप्ला चिन्हावरच लढवायची आहे. बांगलादेशातल्या निवडणूक आयोगाने ते कमळ (शिप्ला) चिन्ह NCP ला दिले नाही, तर बांगलादेशात […]

नाशिक : NCP म्हणजे दमबाजी – दमदाटी हे समीकरणच जणू बनले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सोडून वेगळेच ते समीकरण उदयाला आलेले दिसले. महाराष्ट्रात अजित पवार, रोहित पवार यांच्यापासून अधून मधून सुप्रिया सुळे आणि अन्य राष्ट्रवादीचे नेते दमदाटीची भाषा करत असतात. नेमकी तीच सवय NCP नाव धारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना लागली असल्याचा प्रत्यय आता महाराष्ट्राच्या पलीकडे किंबहुना भारताच्या पलीकडे बांगलादेशात यायला लागला.

बांगलादेश मधल्या नॅशनल सिटीजन पार्टीने म्हणजेच NCP ने एक अजब आग्रह धरला. त्यांना म्हणे, बांगलादेशातली निवडणूक कमळ म्हणजे शिप्ला चिन्हावरच लढवायची आहे. बांगलादेशातल्या निवडणूक आयोगाने ते कमळ (शिप्ला) चिन्ह NCP ला दिले नाही, तर बांगलादेशात निवडणुकाच होऊ देणार नाही, अशी दमदाटी NCP चा नेता नाहिद इस्लाम याचा सहकारी सरजिस आलम याने केली.

– अराजक माजवणारा नेता

सरजिस आलम हा नाहिद इस्लाम याच्याबरोबर बांगलादेशातली शेख हसीना वाजेद यांची राजवट उलथवून टाकण्यात आघाडीवर होता. नाहिद इस्लाम आणि सरजिस आलम यांच्या नेतृत्वाखाली लाखो विद्यार्थी आंदोलनात घुसले होते. त्यांनी बांगलादेशात अराजक माजवून जाळपोळ करून शेख हसीना यांचे सरकार घालविले. त्यानंतर नाहिद इस्लाम याने बांगलादेशात नॅशनल सिटीजन पार्टी स्थापन केली. सरजिस आलम याला उत्तर बांगलादेशाचा पार्टीचा प्रमुख केले. या दोघांनी त्या पार्टीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. नाहिद इस्लाम याने बांगलादेश सिटीजन पार्टीसाठी कमळ चिन्ह मागितले. पण ती मागणी करताना ते चिन्ह मिळाले नाही, तर बांगलादेशात निवडणुका होऊ देणार नाही, जर निवडणुका झाल्या, तर कुणालाही सरकारच स्थापन करू देणार नाही, अशी दमदाटीची भाषा वापरली.

– महाराष्ट्रातली आठवण

नाहिद इस्लाम आणि सरजिस आलम यांनी वापरलेल्या दमदाटीच्या भाषेमुळे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आठवण झाली. अजित पवार, रोहित पवार, सक्षणा सलगर आणि अधून मधून सुप्रिया सुळे हे सगळे नेते अशीच दमदाटीची भाषा वापरतात. विरोधात असतात तेव्हा सरकार उलथवायची भाषा करतात आणि सत्तेवर असतात तेव्हा आम्ही तुमची काम करतोय, तर आमचीच मारता का?? असा सवाल विचारतात. अजितदादांनी आज हा प्रश्न ओला दुष्काळ दौऱ्यावर एका युवकाला केला.

Will contest elections on the lotus symbol, otherwise elections will not be allowed

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment