
नाशिक : राहुल गांधींनी काल 19 जून रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी ते 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले होते. पण मराठी माध्यमांनी त्या वाढदिवसाची फारशी दखलच घेतली नाही. पण म्हणून राहुल गांधींचा वाढदिवस साजरा व्हायचा राहिला नाही. तो साजरा झालाच. उलट राहुल गांधींच्या 57 व्या वाढदिवस त्यांनी एक मोठी “लिबरल” कमाई केली. राहुल गांधी हे देशातले सगळ्यात धाडसी राजकारणी असल्याचा किताब “लिबरल” पत्रकारांनी त्यांना दिला. Rahul Gandhi
धाडसी राजकीय नेत्याचा किताब
एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्ट मध्ये लिबरल पत्रकार निरजा चौधरी, रशीद किडवाई यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची मर्यादेत राहून स्तुती केली. राहुल गांधी आजच्या भारताच्या राजकीय अवकाशात सगळ्यांत धाडसी नेते आहेत, असे निरजा चौधरी म्हणाल्या. पण त्याच वेळी ते अजून नरेंद्र मोदींच्या विरोधातले नेते म्हणून “क्लिक” झालेले नाहीत अशी पुष्टीही जोडायला त्यांनी कमी केले नाही.
राहुल गांधींच्या नेतृत्वातल्या उणिवा
त्याचवेळी रशीद किडवई यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वातल्या उणिवा मोजल्या. राहुल गांधींकडे सुवेंद्र अधिकारी गेले होते ते ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला वैतागले होते सुवेंदू अधिकारी त्यांना म्हणाले होते तुम्ही मला काँग्रेसमध्ये घ्या मला काँग्रेसचा पश्चिम बंगाल मधला चेहरा बनवा, पण त्यावेळी राहुल गांधींनी शुभेच्छा अधिकारींना काँग्रेसमध्ये घ्यायला नकार दिला त्याचा परिणाम आपल्याला पश्चिम बंगालमध्ये दिसला. जोसेफ विजय हे देखील राहुल गांधींकडे गेले होते त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करायची इच्छा दाखवली होती पण राहुल गांधींनी नो वेकन्सी म्हणून विजय जोसेफ यांना नकार दिला. त्याआधी हेमंत विश्वशर्मा हे राहुल गांधींकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारताना राहुल गांधींनी आपल्या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घातली होती पण हेमंत विश्वशर्मांच्या बोलण्याकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा परिणाम आसाम मध्ये दिसला, या सगळ्या घटनांच्या “कटू” आठवणी रशीद किडवई यांनी करवून दिल्या.
“पप्पू” इमेज मधून बाहेर
पण तरीसुद्धा निरजा चौधरी यांनी राहुल गांधींना आजच्या भारतातला सगळ्यात धाडसी नेता हे संबोधन दिले. कारण राहुल गांधी “पप्पू” इमेज मधून बाहेर आले. ते सगळ्या भारतातल्या जनतेला पटले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधींना उद्देशून कुणी “पप्पू” म्हटले नाही. भाजपने राहुल गांधींच्या “पप्पू” इमेजच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची इमेज “लार्जर दॅन लाईफ” केली. पण भाजपचे नेते राहुल गांधींची “पप्पू” इमेज टिकवून धरण्यात यशस्वी झाले नाहीत.
राहुल गांधी लढले
राहुल गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढले. अगदी भारत जोडो यात्रेपासून ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांच्या लढाईचा आलेख चढता राहिला. त्यांना मिळालेला प्रतिसाद देखील वाढता राहिला. मग भले राहुल गांधींच्या राजकीय चुका ठळक असल्या आणि त्या वारंवार पुढे येत असल्या तरी राहुल गांधी निदान लढण्याच्या बाबतीत मागे हटले नाहीत म्हणून लिबरल पत्रकारांनी त्यांना आजच्या भारतातील सगळ्यांत धाडसी नेता हा किताब दिला. राहुल गांधींच्या 57 व्या वाढदिवसाची ही सगळ्यांत मोठी कमाई ठरली, जिच्याकडे “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले, पण म्हणून राहुल गांधींची कमाई छोटी ठरली नाही.
“Liberal” gains on Rahul Gandhi’s 57th birthday.
महत्वाच्या बातम्या
- JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली
- US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद
- Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर
- शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!



Post Your Comment