Trending News

No trending news found.

Saturday, 20 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Shinde’s : ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते; वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shinde’s  बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.Shinde’s

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

काही लोक म्हणाले लांडगेंचे ऑपरेशन करतो. पण तो तर कम्पाउंडर आहे. तो कसा ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. ४ वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी धमक्या दिल्या होत्या. मुंबईतून यावेच लागेल. वरळीतून जावेच लागेल. मुंबई कुणाची जहागीर आहे का? एकनाथ शिंदे एकटा आला. गाडीमध्ये बसला, बायरोड वरळीत येऊन थांबला. तेव्हा धमक्या देणारे घरात बसून ऑनलाईन बघत होते. तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. आता काय तर ऑपरेशन तुडवा. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.Shinde’s



कार्यकर्ता जपला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे – एकनाथ शिंदे

निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आणि निवडणूक झाली नजरेआड हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देतात. हेच आपला प्रचार करत असतात. कार्यकर्ता जपला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तुडवण्याची भाषा करणाऱ्यांवर…. पुढचे जाऊ द्या. त्यामुळे हजारो लोक आपल्यासोबत येत आहेत. दररोज येत आहेत. वेटींग लिस्ट मोठी आहे. का येत आहेत? मी एकटाच निघालो होतो. लोक येत राहिले. कारवा बनता गया. हा कारवा महाराष्ट्रात पसरलाय.

शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला खासदार केले

राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक जण रांगेत उभे होते. परंतु आपल्या शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला म्हणजेच ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. या माध्यमातून आपण शिवसेनेची भूमिका राज्याला दाखवून दिली. अगोदर संपत्ती बघून तिकीट दिले जायचे. मंचावरच्या अनेकांनी मला आपल्या मुलासाठी तिकीट मागितले. परंतु मी त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. त्यानंतर या सर्वांनीच तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. असे सहकारी माझ्यासोबत आहेत. असे सहकारी सोबत असण्यासाठी नशीब लागते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्रजी अन् माझ्या काड्या लावण्याचा प्रयत्न करताय – एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या ११ जागा आपण जिंकल्या शिवाय राहणार नाही. विरोधकांचे खाते देखील उघडणार नाही. त्यांची पाटी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकल्यावरही आपल्यावर आरोप केले. तुमचे उमेदवार टिकले नाही, पळून गेले. त्याला आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, आपली महायुती मजबूत आहे. तिन्ही पक्षांचे बॉडिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. काही लोक लपून छपून जाऊन त्यांना सांगतात. पण ते आम्हाला येऊन सगळं काही सांगतात. कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. त्याच अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले, तरी ही महायुती महाराष्ट्रात वेगाने पुढे जाणार.

चांदा ते बांदा शिवसेनामय झालंय – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, आपण चार वर्षांपूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. महाराष्ट्रातील जनतेने तो स्वीकारला. मागे बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा आशीर्वाद तर होताच, म्हणून जनतेच्या न्यायालयात जिंकलो. लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी होते. आपण उठाव केल्यानंतर ते लोक म्हणाले, कुणी सोबत राहणार नाही. कुणी निवडून येणार नाही. पण मी पहिल्या भाषणात म्हणालो होतो, एक जरी निवडून आला नाही, तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. ४० आमदार होते, एकनाथ शिंदेने ६० आमदार निवडून आणले.

एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्याकडे आमदार आणि खासदार होतेच, त्यातच आता ६० नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती, महापालिकांचे महापौर आहेत. सगळीकडे शिवसेनेचे वादळ घोंगावते आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. चांदा ते बांदा शिवसेनामय करून टाकण्याचे काम माझ्या शिवसैनिकांनी केले याचा मला अभिमान आहे.

रक्ताचे नाते सांगून कुणी वारस होत नाही – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, केवळ नावात बाळासाहेब असून चालत नाही. तर तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमांनी साजरे करणार आहोत. रक्ताचे नाते सांगून कुणी वारस होत नाही. सातबारावर आपले नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या-तुमच्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना राजकीय पक्ष नाही, तर भगवे वादळ आहे. जो भगव्याला विसरला, तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करत आहात. ही तुमची वारसदारी. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम केले. जिवापाड शिवसेनेवर प्रेम केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले, त्यांना तुम्ही शिव्या देत आहात. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कुणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गात आहेत. ज्यांनी गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवला, शिवसेनेचा विचार पुढे नेण्याचे काम केले, त्यांना शिव्या देताय.

बाळासाहेबांनी मोदी-शहांचे मुक्तकंठाने अभिनंदन केले असते – एकनाथ शिंदे
याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे देखील अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील नक्षलवाद त्यांनी संपवला नाही, तर देशातील संपूर्ण नक्षलवाद संपवण्याचे काम त्यांनी केले. कलम ३७० हटवण्याचे काम त्यांनी केले. आज जर बाळासाहेब असते, तर त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मुक्तकंठाने अभिनंदन केले असते. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती.

आज जे देशाला पुढे नेत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प करत आहेत, त्यांच्यावर रोज आरोप करत आहेत. त्यामुळे लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. यंदाचे वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज आपण शिवसेना गावागावात पोहोचवण्याचे काम केले. शिवसेना महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचे काम केले. हीच खरी बाळासाहेबांना त्यांच्या जन्मशताब्दी बद्दल आदरांजली आहे.

मोदींनी बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण केल…

“Wolf in Tiger’s Hide”: Shinde’s Fierce Counter-Attack on Thackeray Over Operation Tiger

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment