विशेष प्रतिनिधी
नाशिक : Nashik Corporate कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.Nashik Corporate
संशयित कारागृहाबाहेर आले तर पीडितेच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली. शुक्रवारी नाशिक रोड न्यायालयात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. जामीन अर्जावर २५ रोजी निर्णय होणार आहे.Nashik Corporate
सरकार पक्षातर्फे ॲड. गायकवाड, पीडितेच्या वतीने ॲड. मिलिंद कुरकुटे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात ‘इन कॅमेरा’ सुनावणी झाली. दानिश शेख याने पीडितेशी जवळीक साधताना अविवाहित असल्याचे सांगितले होते. तपासात दानिश याचे २०१८ मध्ये लग्न झाल्याचे उघड झाले.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. तरी त्याने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे सिद्ध झाले. पीडितेच्या धर्मांतराचा मोठा कट रचला होता. संशयितांनी संगनमत करत मोबाईलमध्ये धर्मांतराचे ॲप डाऊनलोड करायला लावले. यात तारीक जमालचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. निदा खान, तौसिफ अत्तारच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल, दानिश शेखच्या वतीने ॲड. फहीद वासीद यांनी युक्तिवाद केला.
बुरखा, धार्मिक पुस्तके जप्त
निदा खानने पीडितेचे ब्रेनवॉश करून बुरखा दिला. दानिशने मुस्लिम धार्मिक पुस्तके दिली, पीडितेच्या धर्मांतरासाठीची काही कागदपत्रे पोलिसांनी दानिश शेखच्या याच्या पत्नीच्या भावाच्या ताब्यातून जप्त केली. यातून पीडितेच्या सक्तीने धर्मांतराचा पूर्वनियोजित कट होता हे प्रथमदर्शनी स्पष्ट होतो.
Nashik Corporate Jihad Case: Evidence Submitted in Court Against Danish Shaikh
महत्वाच्या बातम्या
- JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली
- US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद
- Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर
- शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!


Post Your Comment