
नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.
- फुटलेल्या सहा खासदारांचा मोदी सरकारला पाठिंबा
दिल्ली आणि मुंबईत काल रात्री आणि आज प्रचंड घडामोडी घडवून उद्धव ठाकरेंनी आपल्या फुटीर खासदारांची “सोय” भाजपच्या सत्तेत लावून दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला पाठिंबा दिला. तसे पत्र त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार फुटले, यावर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला.
#WATCH | Delhi | Addressing a press conference over speculations of a split in the party, Shiv Sena UBT MP Sanjay Raut hurls abuses at suspected rebel MPs, asks the media not to cut out his comments pic.twitter.com/eJUk8rINO1
— ANI (@ANI) June 17, 2026
- उद्धव ठाकरेंची दिरंगाई
पण या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरेंनी वेळीच हस्तक्षेप करून जाणाऱ्या खासदारांना परिणामकारक रित्या रोखले नाही उलट त्यांनी जाणाऱ्या खासदारांची सोयच लावून दिली. उद्धव ठाकरेंनी शिवसेना संसदीय पक्षाची बैठक 18 तारखेला म्हणजे उद्या बोलवली. ती आज बोलवलीच नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या खासदारांना विशिष्ट वेळ मिळून फुटायची “सोय” झाली. सहा खासदारांनी फुटायची वेळ साधून घेतली.
या दरम्यान संजय राऊत अनिल देसाई वगैरे लोकांनी कायदेतज्ञांची मते घेण्यात वेळ घालविला. त्यामुळे ६ खासदारांना विशिष्ट राजकीय आणि कायदेशीर प्रक्रिया करून फुटण्याचा वेळ मिळाला. कायदेतज्ञांनी माध्यमांशी बोलून कायदेशीर सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार अखेर फुटले.
- संजय राऊतांची शिवीगाळ
त्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन फुटलेल्या सहा खासदारांच्या नावाने ते साले भोसडीचे अशी शिवीगाळ केली. त्यांनी राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचे कौतुक केले. त्याचवेळी अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर शिवसेना फुटीचे खापर फोडले. सुप्रीम कोर्टाने आमच्या पब्लिक लिटिगेशन केस वर आधीच निर्णय दिला असता, तर आजची खासदारांची फूट घडूनच आली नसती, असा दावा अनिल देसाई यांनी केला.
- आधी लावली “सोय”, नंतर शिवीगाळ
या सगळ्या घडामोडीतून एकच बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या सहा फुटीर खासदारांची “सोय” भाजपच्या सत्तेत लावून दिली. फुटणाऱ्या खासदारांना परिणामकारक अटकाव केला नाही. उलट त्यांनी फुटावे यासाठी दिरंगाईने हालचाली करून खासदारांच्या फुटण्याला वेळ मिळवून दिला. नंतर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांच्या विरोधात शिवीगाळ केली.
- पवारांच्या आठ खासदारांना विचारलेच नाही
शिवसेनेचे खासदार फुटावेत यासाठी निदान सत्ताधारी गोटातून काही प्रयत्न तरी करण्यात आले. ते यशस्वी झाले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांना भाजपने किंवा शिवसेनेने किंवा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने हिंग लावून सुद्धा विचारले नाही. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तशी कुणाला परवानगीच दिली नाही.
Shiv Sena UBT MP Sanjay Raut hurls abuses at suspected rebel MPs, asks the media not to cut out his comments
महत्वाच्या बातम्या
- jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली
- Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला
- RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
- महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!



Post Your Comment