Trending News

No trending news found.

Saturday, 13 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

RSS : संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??

संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??, असा सवाल विचारायची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या एका कॅम्पेनमुळे आली.

नाशिक : संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??, असा सवाल विचारायची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या एका कॅम्पेनमुळे आली.RSS: A massive smear campaign to defame the Sangh; but what is the Sangh’s response to it?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षामध्ये विविध कार्यक्रम देशभर आणि परदेशातही सुरू असताना काही सोशल मीडिया हँडल्सनी संघाविरुद्ध मोठे कॅम्पेन सुरू केल्याचे दिसून आले. त्यामध्ये लेटेस्ट न्यूज, अजमत फॉर इंडिया आणि बिराजदार या सोशल मीडिया हँडलचा समावेश असल्याचे संघाच्या सोशल मीडियावर नमूद केले गेले. संघाविरुद्धच्या कॅम्पेनला बळी पडू नका. संघाच्या वाढत्या प्रभावामुळे अराष्ट्रीय तत्वांचे मानसिक संतुलन बिघडले‌. त्यांनी संघाविरुद्ध मोठे कॅम्पेन सुरू केले. संघाच्या शाखा 50 % नी घटल्याच्या खोट्या बातम्या पसरविल्या. संघाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसल्याचा अपप्रचार केला. सरसंघचालक आणि संघाचे प्रचारक यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह आणि अशोभनीय भाषा वापरून समाजात द्वेष आणि असंतोष निर्माण केला, या कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे संघाच्या सोशल मीडिया हँडलवर नमूद केले गेले.



यातला संघाच्या सोशल मीडिया आहे नमूद केलेला बहुतांश भाग खरा आणि राजकीय – सामाजिक तथ्य असणाराच आहे. संघाने देशविघातक तत्त्वांच्या विरोधात उभारलेला लढा सुद्धा बरोबर आहे. पण देशविघातक तत्त्वांनी संघाविरुद्ध चालविलेले कॅम्पेन बिलकुल नवीन नाही. त्यांनी गेल्या १०० वर्षांत अनेकदा असेच कॅम्पेन चालवून संघाला बदनाम केले.

– Reluctant organisational force

पण प्रश्न त्या पलीकडचे आहेत. जर संघाविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या विस्तृत काळात बदनामीचे कॅम्पेन चालले असेल, तर संघाने कृती मधून त्या कॅम्पेनला काय उत्तर उत्तर दिले?? देशविघातक तत्त्वांचे कॅम्पेन का नाही हाणून पाडले??, देशविघातक तत्वांचे कॅम्पेन हाणून पाडायला संघाला कुणी रोखले होते??, संघाने या म्हणजे उत्तरे दिली पाहिजेत.

देशविघातक तत्त्वांनी संघावर वाट्टेल ते आरोप केले. संघाने ज्या चुका केल्या नाहीत, त्या सगळ्या चुका संघावर लादल्या. पण संघाने तेवढीच प्रभावी कृती करून या देशविघातक तत्त्वांना कधी प्रत्युत्तर दिले नाही. देशविघातक तत्त्वांनी निर्माण केलेले खोटे “नॅरेटिव्ह” संघाने प्रभावी कॅम्पेन चालवून हाणून पाडल्याचे दिसले नाही.

– संघाचे बचावात्मक पवित्र

उलट संघाने अनेकदा बचावात्मक पवित्रे घेऊन टीकेपासून दूर जायचाच प्रयत्न केला. संघाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी सातत्यपूर्ण काम जरूर केले. मोठमोठी कामे निश्चित उभी केली. त्यातून संघ कायम समाजाला अभिमुख असा राहिला. त्यात कुठलीही शंका नाही. पण संघाने आणि संघ नेतृत्वाने आक्रमक पद्धतीने आपल्या विरुद्धच्या कॅम्पेनला कधीही उत्तर दिले नाही. त्यामुळे संघाची प्रतिमा एक reluctant organisational force अशी निर्माण झाली. ही प्रतिमा निर्माण व्हायला संघबाह्य प्रवृत्ती जशा कारणीभूत ठरल्या, तसाच संघाच्या नेतृत्वाचा सुद्धा तो दोष ठरला.

– संघाचा दोष

संघाला स्वतःचे मीडिया हाऊस कधी निर्माण करता आले नाही. जे मीडिया हाऊस त्यांच्या ताब्यात होते, ते त्यांना पुरेसे प्रभावीपणे टिकवून चालविता आले नाही आणि त्यातून संघाला अनुकूल असा social and political narrative प्रस्थापित करता आला नाही.

 

ज्यावेळी संघ शिक्षा वर्ग सगळीकडे सुरू आहेत, त्यावेळी संघाच्या सोशल मीडिया हँडलने संघाच्या विरुद्ध चाललेला कॅम्पेन विरुद्ध आवाज जरूर उठविला. संघाविरुद्ध चाललेल्या कंपन्या बळी पडू नका, असे जरूर सांगितले, पण संघाच्या शाखा 50% नी कमी झाल्यात या नॅरेटिव्हला छेद देणारी आकडेवारी त्यांनी प्रभावीपणे सादर केली नाही. हा संघ विरोधकांचा दोष नाही. हा संघ नेतृत्वाचा आणि संघ स्वयंसेवकांचा दोष आहे.

– संघाची प्रचंड आकडेवारी प्रभावीपणे का सांगत नाहीत??

संघाचे 35 लाख पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत, हे 2025 च्या दसऱ्याच्या संचलनाच्या आकडेवारीतून पुढे आले. संघाची दीड लाख पेक्षा जास्त सेवा कार्य सुरू आहेत आणि संघाच्या शाखांची संख्या 75000 पेक्षा जास्त आहे, हे संघातल्याच काही सोशल मीडिया हँडल्सनी अनेकदा सांगितले होते. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा या आकडेवारीच्या अनेकदा उच्चार केला गेला होता. पण सध्याच्या सोशल मीडियाच्या भडीमाराच्या काळात संघाने आपल्या वास्तववादी आकडेवारीचा प्रचार आणि प्रसार एवढ्या प्रभावीपणे केलेले दिसले नाही. त्यांनी या आकडेवारीचा अक्षरशः सोशल मीडियावर भडिमार करायला हवा होता, पण तो त्यांनी त्यांच्याच reluctant स्वभावामुळे केला नाही. म्हणून देशभरातली कुठलीही किरकोळ संघटना संघाविरुद्ध एखादे कॅम्पेन उभे करू शकते आणि संघाविरुद्ध मोठे नॅरेटिव्ह चालवू शकते. हा संघ विरोधकांचा जसा आगाऊपणा किंवा खोडसाळपणा आहे, तसाच तो संघाच्या अधिकाऱ्यांचा आणि स्वयंसेवकांचा मूलभूत दोष आहे. तो नाकारण्यात मतलब नाही. उलट संघाच्या नेतृत्वाने आणि संघ स्वयंसेवकांनी अत्यंत आक्रमकपणे कॅम्पेन चालवून आपल्या विरोधातले कॅम्पेन हाणून पाडले पाहिजे. त्यासाठी सर्व वैध मार्गांचा अवलंब केला पाहिजे. आपल्या अंगात मुरलेली reluctancy स्वतःहून दूर केली पाहिजे. अन्यथा बाहेरून कुणी येऊन ती दूर करणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, तर आणि तरच संघाविरुद्धच्या कॅम्पेनला आक्रमक प्रत्युत्तर देऊन संघ विरोधकांची तोंडे गप्प करता येतील. अन्यथा संघाची reluctant organizational force हीच प्रतिमा कायम राहील आणि त्याला इलाज नसेल!!

RSS: A massive smear campaign to defame the Sangh; but what is the Sangh’s response to it?

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment