Trending News

No trending news found.

Saturday, 13 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्ध व्यक्ती सरोश दस्तूर यांना परप्रांतीय वाहनचालकाने मारहाण केली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला.

विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्ध व्यक्ती सरोश दस्तूर यांना परप्रांतीय वाहनचालकाने मारहाण केली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला.

या मारहाणीत त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी सरोश दस्तूर यांच्याशी संवाद साधून त्यांनी अगदी हिंमतीने लढा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले.

तत्पूर्वी, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेऊन ज्युपिटर हॉस्पिटल जवळ जाऊन परप्रांतीय चालकांना मनसे स्टाईलने समज दिली होती. वृद्ध व्यक्ती सरोश दस्तूर यांच्याशी संवाद साधला होता.

– राज ठाकरेंचा संवाद

त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सरोश दस्तूर यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला होता. सरोश दस्तूर यांचा उल्लेख स्थानिक नागरिकांनी स्वच्छता दूत असा केला. ते नेहमीच स्वच्छतेसाठी आग्रही असल्याचा उल्लेख केला. याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेऊन सरोश दस्तूर यांच्याशी संवाद साधला आणि परप्रांतीय चालकावर कलम ३०७ अंतर्गत कारवाई केली.

Section 307 invoked against a driver from another state who assaulted an elderly man in Thane: Eknath Shinde.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment