Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

INDIA Alliance : दिल्लीत 8 जूनला ‘इंडिया’ आघाडीची महाबैठक; ममता, राहुल, अखिलेश एकाच मंचावर, विरोधकांची नवी रणनीती ठरणार

लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांतील राजकीय उलथापालथीनंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. ८ जून रोजी नवी दिल्लीत आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून त्यामध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सुमारे १५ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : INDIA Alliance  लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांतील राजकीय उलथापालथीनंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. ८ जून रोजी नवी दिल्लीत आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून त्यामध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सुमारे १५ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.INDIA Alliance

भाजपविरोधी लढ्यासाठी नवी रणनीती

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील सरकारविरोधात संयुक्त भूमिका कशी घ्यायची, संसदेत समन्वय कसा वाढवायचा आणि आगामी निवडणुकांसाठी विरोधी पक्षांमध्ये एकजूट कशी मजबूत करायची, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. गेल्या काही महिन्यांत विरोधी आघाडीत मतभेद आणि राजकीय तणावाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.INDIA Alliance


शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

ममता बॅनर्जींच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष

पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे. अलीकडेच तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा व्यक्त केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील संबंध पुन्हा सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्यांवरील कथित हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित करू शकतात.

अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमधील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.

द्रमुक आणि आम आदमी पक्षाबाबत अनिश्चितता

या बैठकीत सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहतीलच असे नाही. काँग्रेस आणि द्रमुकमधील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे द्रमुक सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आम आदमी पक्षाने आधीच आघाडीपासून काहीसे अंतर राखल्याने त्यांच्याही सहभागाबाबत अनिश्चितता आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर विरोधकांचे आत्मपरीक्षण

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षांमध्ये नव्याने राजकीय गणिते मांडली जात आहेत. काही राज्यांतील पराभवानंतर विरोधकांमध्ये आत्मपरीक्षण सुरू असून, भविष्यातील लढाईसाठी अधिक समन्वयाची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

एक वर्षानंतर पुन्हा मोठी बैठक

‘इंडिया’ आघाडीची शेवटची अधिकृत मोठी बैठक लोकसभा निवडणुकीपूर्वी जून २०२४ मध्ये नवी दिल्लीत झाली होती. त्यानंतर विविध संसदीय अधिवेशनांपूर्वी समन्वय बैठका झाल्या, मात्र सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक झालेली नव्हती. त्यामुळे ८ जूनची बैठक विरोधी आघाडीच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी ठरू शकते.

राजकीय संदेश काय?

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांमध्ये मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरू असतानाच ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांसारखे प्रमुख नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता हा स्वतःमध्ये मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण आणि आघाडीतील एकजूट कायम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाऊ शकतो.

INDIA Alliance Mega Meeting in Delhi on June 8: Mamata, Rahul, Akhilesh to Join Forces

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment