Trending News

No trending news found.

Saturday, 13 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

शिवकुमार यांना दिलेला शब्द खरा करून राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!

डी. के. शिवकुमार यांना दिलेला शब्द खराब होऊन राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!, या शब्दांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधल्या घडामोडींचे वर्णन करावे लागेल.

नाशिक : डी. के. शिवकुमार यांना दिलेला शब्द खराब होऊन राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!, या शब्दांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधल्या घडामोडींचे वर्णन करावे लागेल.Rahul Gandhi saved the Congress government in Karnataka by keeping his promise to Shivakumar!!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या सकाळी राजीनामा देणार असून त्यांच्यानंतर डी. के‌ शिवकुमार मुख्यमंत्री होतील. त्यांच्याबरोबरच काँग्रेस मधले चार नेते उपमुख्यमंत्री होतील. काँग्रेसने त्यासाठी लिंगायत, दलित, अल्पसंख्यांक असा फॉर्म्युला वापरून नवीन मंत्रिमंडळ बनवायचे ठरविले आहे, अशा बातम्या अनेक माध्यमांनी दिल्यात.



पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधींनी शिवकुमार यांना दिलेला शब्द खरा करून कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार वाचविले, या वस्तुस्थितीकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. अन्यथा कर्नाटक मध्ये सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधल्या राजकारणाचे रिपीटेशन झाल्याशिवाय राहिले नसते.

– जोडगोळ्यांच्या कष्टांमधून सरकार

कर्नाटक मधल्या सिद्धरामय्या – शिवकुमार अशा जोडगोळीप्रमाणेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या जोडगोळ्यांनी कष्ट करून सरकार आणून दाखविले होते. पण राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमधल्या तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला त्या राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली.

– मध्य प्रदेश मधला धडा

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचंड कष्ट करून काँग्रेसची सत्ता आणली होती. काँग्रेसने त्यांनाच मुख्यमंत्रीपदावर बसवायला हवे होते पण काँग्रेसच्या नेत्यांनी कमलनाथ यांना मुख्यमंत्री पदावर बसविले त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस पासून दूर गेले. काही वर्षांनी भाजपमध्ये आले आणि थेट केंद्रीय मंत्री झाले. या दरम्यान मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचे कायमचे पतन झाले. कमलनाथ सत्तेवरून बाहेर फेकले गेले. ते अजूनही राजकीय शॉक मधून बाहेर आलेले नाहीत.

– राजस्थानातली चूक

राजस्थान मध्ये सचिन पायलट यांनी भरपूर कष्ट करून काँग्रेसची सत्ता आणून दाखविली होती. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवून ठेवले. वयोवृद्ध अशोक गहलोत यांच्यावर अतिरिक्त विश्वास टाकून त्यांनाच मुख्यमंत्री ठेवले‌. परिणामी राजस्थान मधून काँग्रेसची सत्ता गेली. अशोक गेहलोत काँग्रेसला सत्तेवर टिकवून ठेवू शकले नाहीत. सचिन पायलट यांना डावलल्याचा फटका काँग्रेसला बसला.

– छत्तीसगड मध्ये फटका

छत्तीसगड मध्ये सुद्धा याच राजकारणाचे रिपीटेशन झाले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी टी. एस. सिंगदेव यांना मुख्यमंत्री करायचा शब्द दिला होता. पण काँग्रेसने तो शब्द पाळण्याऐवजी भूपेश बघेल यांनाच मुख्यमंत्री पदावर ठेवले. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या वादांमध्ये छत्तीसगड मधली काँग्रेसची सत्ता गेली.

– कर्नाटका सुधारणा, राहुल गांधींच्या खात्यात यश

वेगवेगळ्या जोड गोळ्यांच्या वादांमुळे काँग्रेसची सत्ता जाते हे लक्षात घेऊनच राहुल गांधींनी शेवटी सिद्धरामय्या यांना पायउतार व्हायला सांगितले. त्यांच्या ऐवजी शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे राहुल गांधींनी कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार वाचाविले. अन्यथा शिवकुमार यांच्यापुढे बंडखोरी करून भाजप बरोबर जाऊन सरकार स्थापन करायचा राजकीय पर्याय उपलब्ध होताच. राहुल गांधी शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले नसते तर कर्नाटकात त्यांनी लगेच काही बंडखोरी केली नसती. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सिग्नल मिळाल्याबरोबर ते बंडखोरी करायचे सुद्धा राहिले नसते. मग त्यावेळी राहुल गांधींना शिवकुमार यांना आवरणे सुद्धा कठीण झाले असते. त्यामुळे राहुल गांधींनी योग्य वेळीच निर्णय घेऊन शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्याने खुद्द शिवकुमार यांची महत्त्वाकांक्षा काँग्रेसमध्ये राहूनच पूर्ण झाली त्याचबरोबर कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार जाता जाता वाचले. बाकी मंत्री कोण होईल??, काँग्रेस मधले बदल काय होतील??, याची चर्चा पक्षात आणि बाहेर होत राहील पण एरवी सगळीकडे अपयश आलेल्या राहुल गांधींच्या खात्यात कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार टिकवून दाखविल्याचे यश जमा होईल!!

Rahul Gandhi saved the Congress government in Karnataka by keeping his promise to Shivakumar!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

adddad
June 13, 2026

adddad
June 13, 2026

Stay Connected With Us

Post Your Comment