Trending News

No trending news found.

Monday, 18 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!

केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.

नाशिक : केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.

केरळ मध्ये मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी एका मोठ्या समारंभात मुख्यमंत्र्यांना आणि अन्य मंत्र्यांना शपथ दिली.

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी सगळे वरिष्ठ नेते शपथविधी समारंभाला हजर होते.

– राहुल गांधींकडून औचित्यभंग

मात्र या समारंभात राहुल गांधींनी औचित्यभंग केला. एकीकडे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे मंत्र्यांना शपथ देत असताना आणि मंत्री ती शपथ वाचत असताना राहुल गांधी मात्र स्टेजवरच एका लहान मुलीशी हास्य विनोद करण्यात मग्न होते. आता राहुल गांधी स्वतःच लहान मुलीशी गप्पा मारत आहेत, हे पाहून मुख्यमंत्री सतीशन आणि प्रियांका गांधी सुद्धा त्या गप्पांमध्ये सामील झाले. एकीकडे मंत्री शपथ वाचत होते आणि त्याच स्टेजवर हे लहान मुलीशी गप्पा मारत होते. याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. विच अ लिटिल फ्रेंड ऑफ माय केरलम फॅमिली असे त्याला टायटल दिले. राहुल गांधींनी शेकहॅंड करून तिला नाव विचारले. तू कितवीत आहेस, तू नंतर काय करणार आहेस??, असे विचारले. त्या मुलीने आपले नाव सांगितले. आपल्याला डॉक्टर बनायचे असल्याचे सांगितले.

– मुख्यमंत्र्यांच्याही स्टेजवरच गप्पा

वास्तविक राहुल गांधी त्या मुलीला शपथविधी समारंभ पूर्ण झाल्यावर देखील भेटू शकत होते. पण ते ऐन शपथविधीच्या वेळी तिला भेटले. मंत्री शपथ वाचत असताना तिच्याशी बोलत बसले. त्यामुळे मुख्यमंत्री सतीशन आणि प्रियांका गांधी यांचेही लक्ष विचलित झाले. त्यांनाही शपथविधी समारंभाचे गांभीर्य उरले नाही.

Rahul Gandhi and Chief Minister Satheesan were engrossed in playful banter with a little girl on the stage!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment