Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

काळा कोट घालून ममता हायकोर्टात; पण TMC चा नेता शमीम अहमदच्या घरावरच्या छाप्यातून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!

काळा कोट घालून ममता बॅनर्जी गेल्या हायकोर्टात; पण TMC च्या नेत्याच्या घरावरच्या छाप्यांमधून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!, हेच भयानक वास्तव पश्चिम बंगालमधून समोर आले.

नाशिक : काळा कोट घालून ममता बॅनर्जी गेल्या हायकोर्टात; पण TMC च्या नेत्याच्या घरावरच्या छाप्यांमधून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!, हेच भयानक वास्तव पश्चिम बंगालमधून समोर आले.Mamata goes to High Court wearing a black coat; but gold loot comes to light during raid on TMC leader Shamim Ahmed’s house!!

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका हरल्यानंतर ममता बॅनर्जींनी न्याय मागण्याचा आव काळा कोट घालून कोलकत्ता हायकोर्टात दाद मागितली. त्यांनी न्यायमूर्तींच्या समोर आर्ग्युमेंट सुद्धा केले. पण त्याचवेळी त्यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी तळघरातून सोन्याच्या पलंगासह बरीच लूटपाट बाहेर आली. ममता बॅनर्जींनी काळा कोट घालून हायकोर्टात आर्ग्युमेंट केले. त्यांना तसा वकिली प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे का??, त्यांच्याच्याकडे सनद आहे का??, ही सनद सध्या वकिली करण्यासाठी वैध आहे का??, असे सवाल राष्ट्रीय बार कौन्सिलने उपस्थित केले. त्यामुळे ममता बॅनर्जींची काळ्या कोटातली वकिली कायद्याच्या कचाट्यात सापडली.



– शमीम अहमदच्या घरावर पोलिसांचा छापा

पण त्याच वेळी पोलिसांनी कोलकत्याच्या हावडा परिसरात टीएमसीचा बाहुबली नेता शमीम अहमद याच्या बोर/बडे, शिवपूर/मधल्या घरावर छापा घातला. शमीम अहमदची पत्नी तिथली तृणमूल काँग्रेसची नगरसेविका आहे. शमीमच्या घरावर 14 मे 2026 रोजी पोलिसांचा छापा घातला, तेव्हा त्यांना घराच्या खाली एक आलिशान भूमिगत तळघर आढळून आले. त्यामध्ये सोन्याचे पत्रे ठोकलेला बेड, मोठा अलिशान बाथटब, महागडे फर्निचर, लाखो रुपयांचे बेड, महागड्या गाद्या, एसी, फ्रिज, सीसीटीव्ही, अन्य विलासी वस्तू आणि प्रदर्शनीय वस्तू आढळल्या.

– सोन्याचा बेड आणि सोन्याचा सोफा

शमीम अहमदच्या घरातल्या अनेक खोल्या, स्वयंपाकघरांसह तळघर, सोन्याचा बेड, सोन्याचा सोफा आणि अनेक किलोग्रॅमचे सोन्याचे दागिने, घरातले सर्व फर्निचर सोन्याचे असल्याचे पाहून पोलीस सुद्धा आवाक् झाले.

– ममतांनी घातले मुस्लिम गुंडांना पाठीशी

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत हिंसाचार, बॉम्बस्फोट, गोळीबार करून शमीम अहमद फरारी झाला. पण पोलिस त्याला अटक करायला त्याच्या घरी गेले, तेव्हा त्यांना हे सोन्याचे प्रचंड घबाड मिळाले. ममता बॅनर्जींनी काळा कोट घालून हायकोर्टात जाऊन न्याय मागण्याचा आव आणला, पण त्यांच्या राजवटीच्या काळात त्यांच्या मुस्लिम गुंड नेत्यांनी घरामध्ये चोरट्या सोन्याचा साठा केला. पण ममतांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

Mamata goes to High Court wearing a black coat; but gold loot comes to light during raid on TMC leader Shamim Ahmed’s house!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment