Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक; पण साध्य काय होणार??

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.

नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.

– सुप्रिया सुळेंचे नेतृत्व लादायचा प्रयत्न निष्फळ

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासाठी शरद पवार गटाने रेटून प्रयत्न केले. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व लादायचा प्रयत्न केला. पण सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या साहाय्याने विलीनीकरणाचा विषय हाणून पाडला. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला काटशह देण्यासाठी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व पुढे आणले. शरद पवारांना हे सगळे खटकले, पण ते काही करू शकले नाहीत. नंतर ते आजारी पडले दोन वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्री होऊन मंत्रिमंडळात स्थिरावल्या. त्यांनी तीन महिन्यांमध्येच आपले खरे राजकीय रंग दाखवून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख कापले. जय आणि पार्थ या आपल्या दोन मुलांच्या राजकीय पंखांमध्ये बळ भरले.

– शरद पवार सावध, पण…

त्यामुळे शरद पवार अधिक सावध झाले. त्यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षावर टीकाटिपणी करून सुनेत्रा पवारांना खिंडीत गाठले. पंख कापलेले सुनील तटकरे शरद पवारांना भेटल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुनरुज्जिवित केली. त्यातूनच गुप्त बैठकीची बातमी समोर आली.

– पुण्यातल्या हॉटेलात गुप्त बैठक

पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या गुप्त बैठकीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, देवदत्त निकम हे हजर होते. त्यांनी म्हणे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दीर्घकाळ चर्चा केली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या गुप्त बैठकीला पवार कुटुंबांपैकी कुणीही हजर असल्याची बातमी आली नाही, यातच या बैठकीचे राजकीय वैफल्य स्पष्ट झाले.



– विलीनीकरणासाठी तडफड, पण…

पण या सगळ्या मधून शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची विलीनीकरणाची तडफडच समोर आली. कारण एक तर सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पंख कापल्यानंतर आपल्या दोन मुलांच्या म्हणजेच जय आणि पार्थच्या राजकीय पंखांमध्ये बळ भरले. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांचे राष्ट्रवादीतले राजकीय भवितव्य तर धोक्यात आलेच, पण त्या पलीकडे जाऊन पवार कुटुंबातच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला पुढच्या पिढीकडूनही आव्हान तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे एकमुखी नेतृत्व उरले नाही. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित व्हायच्या आतच पवारांच्या घरातच नेतृत्वाला चार तोंडे फुटली. एकाच वेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या स्पर्धा निर्माण झाली. त्याचवेळी रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार असे समकक्ष आणि समांतर राजकीय नेते तयार झाले. असे जास्त तोंडाचे नेतृत्व तयार झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक बळ वाढले की नाही, हा भाग अलहिदा, पण नेतृत्वाची स्पर्धा मात्र जास्तच तीव्र झाली. “पवार बोले आणि राष्ट्रवादी हाले” अशी स्थितीच उरली नाही. म्हणून तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी गुप्त बैठक घ्यायला लागून तिची बातमी पेरावी लागली, अन्यथा शरद पवारांच्या एका आदेशात एका झटक्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते. पण ते घडले नाही, याचा अर्थच विलीनीकरणाचा विषय पवारांच्या हातात उरलेला नाही.

– पवारांचा वकूब नाही उरला

शरद पवार गटाने अजित पवारांशी झालेल्या चर्चेचे अनेक पुरावे देऊन सुद्धा प्रत्यक्षात ते विलीनीकरण घडून आले नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करणे ही पवारांची राजकीय क्षमता उरलेली नाही. त्यामध्ये भाजप नावाच्या शक्तिशाली घटकाचा निर्णायक प्रवेश झालाय आणि जोपर्यंत भाजपचे केंद्रीय नेते मान्यता देत नाहीत, तोपर्यंत गुप्त बैठका घेतल्या किंवा उघड बैठका घेतल्या, तरी शरद पवारांच्या अनुयायांना आणि पवारांच्या घरातल्या नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करता येणे शक्य नाही.

Struggle for merger of both nationalist parties resumes

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment