Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sangli temple : सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू; मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष प्रतिनिधी

सांगली : Sangli temple सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.Sangli temple

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका मंदिराची भिंत कोसळून सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Sangli temple



दुर्घटनेत मृतांची नावे:

शंकर आबा लोखंडे पाडोझरी, मंगल भाऊसो मोठे पांडोजरी, संजूबाई राम चौधरी पांडोजरी, कोंडीबा गेजगे दरीबडची तर आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12-14 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिऱ्याच्या दगडाची भिंत कोसळली

जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मंगळवारी भरलेल्या मरगुबाई देवीच्या यात्रेत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भीषण दुर्घटना घडली असून, चिऱ्याच्या दगडाची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी भाविकांनी या भिंतीचा आडोसा घेतला होता, मात्र वाऱ्याच्या तीव्र तडाख्याने ही भिंत अचानक अंगावर पडल्याने झालेल्या या दुर्घटनेत 3 जण गंभीर तर अन्य 15 भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जत आणि विजापूर तालुक्यातील प्रत्येकी 3 व्यक्तींचा समावेश असून, घटनेची माहिती मिळताच जतचे प्रांताधिकारी नष्ठे, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे यात्रेच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.

मरगुबाई देवीच्या यात्रेत भाविकांची गर्दी

मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली असून, यात सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे शेजारच्या बांधकामाचे पत्रे उडून भिंतीवर आदळले आणि ती भिंत कोसळल्याने ही भीषण जीवितहानी झाली. या हृदयद्रावक अपघातात अन्य 20 ते 25 भाविक जखमी झाले असून, प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

6 Devotees Dead as Temple Wall Collapses in Sangli’s Jat During Yatra

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment