Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

मोदींचा जनतेला इंधन बचतीचा सल्ला; राहुल, पवारांसकट विरोधकांना मिळाला बडबडीसाठी मुद्दा!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेला इंधन बचतीचा सल्ला; राहुल, पवारांसकट विरोधकांना मिळाला बडबडीसाठी मुद्दा!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेला इंधन बचतीचा सल्ला; राहुल, पवारांसकट विरोधकांना मिळाला बडबडीसाठी मुद्दा!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस देशातल्या जनतेला इंधन बचतीचा सल्ला दिला. देशाचे परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोल – डिझेल कमी वापरा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, वर्क फ्रॉम होम करा, शाळांमधले क्लास सुद्धा ऑनलाईन भरवा, शक्यतो वर्षभर सोने खरेदी करू नका, परदेशी जाणे टाळा, त्याऐवजी भारतातच पर्यटन करा, भारतातच डेस्टिनेशन वेडिंग करा, असे एकापाठोपाठ एक सल्ले नरेंद्र मोदींनी जनतेला दिले.

– मोदींच्या विरोधात जितेंद्र आव्हाड घोड्यावर

मोदींनी दिलेल्या सल्ल्यांनंतर विरोधकांना त्यावर टीका करायचा मुद्दा मिळाला. राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड वगैरे नेत्यांनी मोदींच्या सल्ल्यांवर टीका केली. राहुल गांधी एकदम देशाची अर्थव्यवस्था गडगडल्याची साक्षात्कारी भीती वाटली. शरद पवारांना सर्वपक्षीय लोकशाही आठवली. सुप्रिया सुळे यांना लोकसभेत स्वतः केलेली भाषणे आठवली. जितेंद्र आव्हाड यांना गाडी सोडून घोड्यावर बसावेसे वाटले. जोपर्यंत नरेंद्र मोदी यांनी बचतीचा सल्ला दिला नव्हता, तोपर्यंत यापैकी कुठल्याही नेत्याला देशाची अर्थव्यवस्था घसरायला लागल्याचे दिसले नव्हते. शरद पवारांना सर्वपक्षीय लोकशाही आठवली नव्हती. जितेंद्र आव्हाड यांना घोड्यावर बसावेसे वाटले नव्हते. पण मोदींनी देशवासीयांना बचतीचा सल्ला दिल्याबरोबर सगळ्या नेत्यांना देशाची एकदम चिंता वाटायला लागली.

– पवारांना मिळाला ट्विट करायचा मुद्दा

शरद पवारांनी मोदींकडे सर्वपक्षीय बैठक बोलवून देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी स्वतः पंतप्रधानांनी माहिती द्यावी, अशी मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीच मागणी रिपीट केली. जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून अदानी आणि अंबानींना कारमध्ये बसायचे सोडून देण्याचा सल्ला दिला.



शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून अघोषित राजकीय निवृत्ती स्वीकारली होती. त्यांच्या आजारपणापासून त्यांनी शक्यतो सार्वजनिक जीवनात भाग घेतला नव्हता. पण ते बरे झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या कुठल्याच विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले नव्हते. नसरापूरची घटना, नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहाद या विषयावर शरद पवार काहीही बोलले नव्हते. त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारून तिथे भाषण केले होते.

– राहुल गांधींनी ठरविले मोदींना “अपात्र”

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचा सल्ला दिल्याबरोबर शरद पवार राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यावर व्यक्त झाले. त्यांनी सोशल मीडिया हँडल वरून सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली. राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवायला अपात्र ठरविले नरेंद्र मोदींची देश चालवण्याची “पात्रता” नाही, हे आता सिद्ध झाले, असा “निवाडा” राहुल गांधींनी देऊन टाकला.

नरेंद्र मोदी जोपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये प्रचारात व्यग्र होते तोपर्यंत विरोधकांपैकी कुठल्याही नेत्याला देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी, इंधन टंचाई विषयी “चिंता” वाटली नव्हती. मोदींवर आक्रस्ताळी टीका करण्यापलीकडे त्यापैकी कुणाचेही विषय गेले नव्हते. पण मोदींनी स्वतः जनतेला बचतीचा सल्ला देऊन विरोधकांच्या हाती बडबड करायचा मुद्दा दिला. त्यामुळे विरोधकांनी वेगवेगळ्या मार्गांनी मोदींच्या विरोधात आज बडबड करून घेतली.

Modi’s advice to the people on fuel conservation

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment