Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

वारकऱ्यांना घुसखोर म्हणणाऱ्या विकास लवांडेंच्या अटकेसाठी वाघोली पोलिसांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा

वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान करणाऱ्या विकास लवांडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान करणाऱ्या विकास लवांडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी वाघोली परिसरातील सकल हिंदू समाजाने वाघोली पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली‌. तसेच त्याला अटक न झाल्यास ११ मे रोजी नगर रोड परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

– समाज भावना दुखावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी नुकतेच वारकरी संप्रदाय, साधूसंत तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त आणि धार्मिक भावना दुखावणारे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे हिंदू समाजात आणि विशेषतः वारकरी संप्रदायात संतापाची लाट आहे. लवांडे नेहमीच वादग्रस्त विधाने करून समाजभावना दुखावण्याचे काम करतात, त्यांच्याविरुद्ध याआधीही पोलिसात तक्रारी दाखल आहेत.

या प्रकरणी शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये नलिनी वायाळ यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९९, ३०२, १९६ (१) (अ) अन्वये गु.र.नं. ०३०८/२०२६ दाखल केला आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अद्याप अपेक्षित कठोर कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

– जातीय तणाव वाढविण्याचा डाव

विकास लवांडेने केलेले हे कृत्य केवळ धार्मिक अपमान नसून यातून परिसरात जातीय तणाव निर्माण होण्याची आणि शांतता भंग होण्याची शक्यता आहे. वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात अधिक गंभीर परिस्थिती ओढवू शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.

– अटकेची मागणी

वाघोली पोलीस प्रशासनास विनंती करण्यात आली आहे की, मुख्य आरोपी विकास लवांडे यांना तात्काळ अटक करावी. अन्यथा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे की, जर १० मे २०२६ पर्यंत आरोपींना अटक झाली नाही, तर सोमवार, ११ मे २०२६ रोजी समस्त हिंदू समाजाच्या वतीने नगर रोड आणि परिसरात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. यादरम्यान होणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडास पोलीस प्रशासन आणि शासन जबाबदार असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Statement to Wagholi police for arrest of Vikas Lawande, who called Warkaris as intruders

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment