Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Iranian Tankers : पुन्हा भडकले युद्ध; इराणचा अमेरिकी युद्धनौका, यूएईवर क्षेपणास्त्र हल्ला, अमेरिकेने इराणचे दोन टँकर उडवले

होर्मुझमध्ये ८ एप्रिलपासून सुरू असलेली युद्धबंदी शुक्रवारी संकटात सापडली. अमेरिकन दाव्यानुसार, इराणने होर्मुझ जलमार्गातून जाणाऱ्या तीन अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लहान बोटींनी हल्ला केला. अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या आत त्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बफेक केली. कमांडने इराणकडे सरसावणारे दोन इंधनाचे जहाज नष्ट केले. यादरम्यान इराणने युएईवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले झाले.

वृत्तसंस्था

तेहरान : Iranian Tankers  होर्मुझमध्ये ८ एप्रिलपासून सुरू असलेली युद्धबंदी शुक्रवारी संकटात सापडली. अमेरिकन दाव्यानुसार, इराणने होर्मुझ जलमार्गातून जाणाऱ्या तीन अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लहान बोटींनी हल्ला केला. अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या आत त्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बफेक केली. कमांडने इराणकडे सरसावणारे दोन इंधनाचे जहाज नष्ट केले. यादरम्यान इराणने युएईवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले झाले.Iranian Tankers

दुसरीकडे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांचे वर्णन ‘लव टॅप’ (प्रेमाने दिलेली थाप) असे केले. ते म्हणाले, युद्धबंदी सुरू आहे आणि कोणत्याही दिवशी करार होऊ शकतो. पण त्याचबरोबर असा इशाराही दिला की, जर तेहरानने तो करार स्वीकारला नाही ज्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक पुन्हा सुरू होऊ शकेल, तर अधिक बॉम्बफेक केली जाईल.Iranian Tankers



 

विधान नको, युरोपने ठोस पावले उचलावीत: रुबिओ

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी युरोपीय देशांवर इराणवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला आहे. त्यांनी युरोपीय मित्रराष्ट्रांना सांगितले आहे की, इराणबाबत फक्त कडक विधाने करून चालणार नाही, तर ठोस कारवाई करावी लागेल. रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी व परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांच्या भेटीनंतर रुबिओ म्हणाले की, इराण धोरणात्मक होर्मुझ जलमार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, जे स्वीकारार्ह नाही. त्यांनी इशारा दिला की यामुळे जगाच्या इतर भागांतही अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळू शकते.

रुबिओ म्हणाले, सर्वजण म्हणतात इराण हा धोका आहे, सर्वजण म्हणतात इराणकडे अण्वस्त्रे नसावीत, पण मग काहीतरी करावेही लागेल. जर उत्तर ‘नाही’ असेल, तर केवळ कडक शब्दांतील विधाने पुरेशी नाहीत.

इराण दबावाखाली येणार नाही: अराघची

इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी या हल्ल्यांना राजनैतिक प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अराघची यांनी विचारले की, हे हल्ले इराणवर दबाव आणण्याचे एखादे कच्चे धोरण आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक मुत्सद्देगिरी अपयशी करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पुन्हा एका दलदलीत ओढू इच्छित आहे. कारण काहीही असले तरी, निकाल एकच राहतो: इराणी कधीही दबावापुढे झुकत नाहीत.

इराणने ओमानच्या आखातात ‘ओशन कोई’ नावाचा तेल टँकर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. इराणचे म्हणणे आहे की हे जहाज त्यांच्या हितांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते.पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अराघचीशी फोनवर चर्चा केली. यानंतर लवकरच कराराची आशा व्यक्त केली.

Middle East War Intensifies: Iran Attacks US Warships; US Destroys Iranian Tankers

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment