
नाशिक : थलपती विजय हा अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळेच पक्ष उठवतायेत फायदा; तामिळनाडू सरकार स्थापनेत अडथळा!!, हेच राजकीय चित्र आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी समोर आले.Thalapathy Vijay is not an experienced politician; Obstacle in government formation in Tamil Nadu!!
थलपती विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने 108 जागा मिळवून तामिळनाडू विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवलेला पक्षाचे स्थान जरूर मिळवले, पण बहुमतासाठी हा आकडा दहाने कमी पडला. काँग्रेसच्या चार आमदारांनी विजयला पाठिंबा दिला, पण नेमके तिथेच राजकीय घोडे अडले. बाकी सगळ्या पक्षांनी विजय आणि काँग्रेस यांचे पॉलिटिकल कॉम्बिनेशन नाकारण्यासाठी वेगवेगळे डाव टाकले. 108 अधिक चार असे 112 आमदार आपल्या बाजूला आहेत म्हटल्यावर राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी सहज बोलावते असा होरा बांधून विजय याने त्यांची भेट घेतली पण राज्यपालांनी बहुमताच्या आकड्याची मेख टाकून विजय याला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यायला नकार दिला.
– द्रविड मुन्नेत्र कळघम सावध
त्यामुळे तामिळनाडूतला राजकीय पेच जास्तच गहिरा झाला. मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने सावधपणे बाजूला राहून बघ्याची भूमिका घेतली. आम्ही पुढचे सहा महिने कुठलीच हालचाल करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. काँग्रेसने विजयला पाठिंबा दिल्याबद्दल मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमने आगपाखड केली. काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. थोडक्यात विजयच्या मार्गात अडथळे उत्पन्न होतील याचेच अप्रत्यक्ष डाव टाकले.
Rajendra Vishwanath Arlekar, Governor of Tamil Nadu, has invited Thiru C. Joseph Vijay, President, Tamilaga Vettri Kazhagam, today to Lok Bhavan, Chennai. During the meeting, the Governor explained that the requisite majority support in the Tamil Nadu Legislative Assembly,… pic.twitter.com/57NboyBnWV
— ANI (@ANI) May 7, 2026
– अण्णाद्रमुकचे “पॉलिटिकल बार्गेनिंग”
अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने 47 आमदारांचा विजयला पाठिंबा द्यायला नकार देऊन “पॉलिटिकल बार्गेनिंग” सुरू केले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष फुटण्याची भीती निर्माण होतात विजयशी वाटाघाटी करण्याचा डाव टाकला. पण अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम फुटेल या आशेवरच विजय राहिला. राजकारणातल्या नसलेल्या अनुभवामुळे विजय कुठलीच आक्रमक पावले टाकू शकला नाही.
– राज्यपालांचे राजकीय वर्तन
त्या पलीकडे जाऊन फक्त एक आमदार असतानासुद्धा भाजपने राज्यपालांच्या करवी काँग्रेसला तामिळनाडूच्या राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकायचा डाव टाकला. भाजपला तामिळनाडू अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष फुटला तर चालणार आहे. किंबहुना तो परस्पर फुटावा, यासाठी तर भाजपच्या नेत्यांचा सगळा डाव सुरू आहे. राज्यपालांचे राजकीय वर्तन हा त्यातला एक घटक आहे.
– विजय अनुभवात कमी
तामिळनाडूतल्या या सगळ्या राजकारणात विजय अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळा खेळ रंगल्याचे दिसून आले. एरवी बाकी कुठल्याही पक्षाला दहा आमदार कमी पडले असते, तर पहिल्या तासाभरात त्या पक्षाच्या अनुभवी नेत्यांनी दुसऱ्या पक्षातले दहा आमदार उचलून आणले असते. अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत समोरच्या पक्ष उभा फोडला असता. पण विजय अनुभवी राजकारणी नसल्याने इतर सगळ्या पक्षांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फायदा उपटता आला. त्यात राज्यपाल सुद्धा एक “पॉलिटिकल पार्टी” ठरले. त्यांनी कायद्यातल्या तांत्रिक बाबींचा आधार घेत विजयला सरकार स्थापन करण्यापासून बाजूला ठेवले. विजयने सुद्धा वेगवान हालचाली करून अण्णाद्रमुक पक्ष फोडला नाही किंवा बाकीच्या पक्षांमध्ये पॉलिटिकल मेसेज देऊन स्वतःचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने खरी पावले अजून टाकली नाहीत. कारण त्याला तेवढा राजकीय अनुभव नाही.
Thalapathy Vijay is not an experienced politician; Obstacle in government formation in Tamil Nadu!!
महत्वाच्या बातम्या
- Sabarimala : सुप्रीम कोर्टाने म्हटले- PIL आता ‘पैसा इंटरेस्ट लिटिगेशन’ बनली; शबरीमाला प्रकरणात वकिलांनी याचिका दाखल केली
- Jalandhar BSF : जालंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर स्फोट, एक जखमी; स्कूटीमध्ये स्फोटके ठेवल्याची शक्यता
- IndiGo Flight : इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा स्फोट; 5 प्रवासी जखमी, बॅगमध्ये ठेवले होते; सर्व 198 प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर



Post Your Comment