Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

तामिळनाडूत पराभव स्वीकारून मुख्यमंत्री स्टालिन यांचा राजीनामा; पण ममतांचा पराभव स्वीकारायला आणि राजीनामा द्यायला नकार!!

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव स्वीकारून मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी राजीनामा दिला. आसाम मध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारून गौरव गोगोई यांनी भाजपच्या सरकारचे अभिनंदन केले, पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव स्वीकारायला नकार देऊन ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सुद्धा आज नकार दिला. त्यामुळे INDI आघाडीतल्या नेत्यांची राजकीय वर्तणुकीतली विसंगती सगळ्यांच्या समोर आली.

– स्टालिन यांचा राज्यपालांकडे राजीनामा

तामिळनाडू मध्ये एम. के. स्टालिन यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम चा पराभव स्वीकारला जनतेचा कौल मान्य केला, तसा त्यांनी व्हिडिओ सुद्धा जारी केला. त्यानंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवून दिले.

– काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून भाजपच्या अभिनंदन

याच दरम्यान आसाम मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आसाम मधल्या निवडणुकीच्या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली, पण विजयी झालेल्या भाजप सरकारचे अभिनंदन केले. त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा दावा केला नाही.

– ममतांचा राजीनामा द्यायला नकार

त्या उलट पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी मात्र आक्रस्ताळी भूमिका घेत मुख्यमंत्री पद सोडायलाच नकार दिला. भाजपचा विजय झालेला नाही. तृणमूल काँग्रेसचा पराभव झालेला नाही. भाजपने 100 आमदार चोरले म्हणून त्यांचा विजय झाला. निवडणूक आयोग आणि भाजप यांनी एकत्र येऊन पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चोरी केली. पण तृणमूळ काँग्रेसचा नैतिक विजय झाला. भाजपचा नैतिक पराभव झाला, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. आपण राजभवनला जाणार नाही. तिथे जाऊन राजीनामा सुद्धा देणार नाही. आपण पराभव स्वीकारतच नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

– सगळ्यांचे फोन, पण पवारांचा नाही

सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन या नेत्यांचे फोन आल्याचे त्यांनी सांगितले. INDI आघाडी आणखी मजबूत झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. पण शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी आपल्याला फोन केल्याचे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे पवारांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला.

या सगळ्या घडामोडींमुळे एम. के. स्टालिन, गौरव गोगोई आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय वर्तणुकीतली परस्पर विसंगती सगळ्यांच्या समोर आली.

West Bengal CM Mamata Banerjee says, “I will not resign

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment