Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Amol Mitkari : उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही; अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी पक्षांतर्गत अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक असतानाही झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली असून, या निवडीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amol Mitkari राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी पक्षांतर्गत अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक असतानाही झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली असून, या निवडीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे.Amol Mitkari

पक्षाने उमेदवारी नाकारत विश्वासात घेण्याचे साधे सौजन्यही दाखवले नसल्याची खंत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यात जो साथ देईल त्याच्यासोबत असे म्हणत अमोल मिटकरी यांनी राजकीय संकेत दिले आहेत.Amol Mitkari



काय म्हणाले अमोल मिटकरी?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे. आपल्याला उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारण्याचेही सौजन्य दाखवले नाही. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याने हे फळ मिळाले. उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नाही. आता भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भात जे सोबत असतील त्यांच्यासोबत जाऊ, असे सूचक विधान मिटकरी यांनी केले आहे.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?

माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र असलेल्या झिशान सिद्दीकी यांनी अत्यंत कमी वयात राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजय मिळवून त्यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला होता, ज्यामुळे त्या काळी ते महाराष्ट्रातील सर्वांत तरुण आमदार ठरले होते. विधिमंडळातील आपल्या सक्रिय कामगिरीसोबतच त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली असून, तरुण नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी आपला एक वेगळा जनसंपर्क तयार केला आहे.

The party did not even ask for clarification while rejecting his candidature; Amol Mitkari expressed regret

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment